आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam Dimasa DNLA Militant Attack Update; Five Truck Drivers Killed In Dima Hasao

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार!:7 ट्रक पेटवले, पाच ट्रकचालक जळून खाक; पोलिसांना हल्ल्यामागे दहशतवादी गट DNLA वर संशय

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील दियुंगबराजवळ गुरुवारी रात्री संशयित अतिरेक्यांनी सात ट्रक जाळल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाच ट्रकचालक जळून खाक झाले. अहवालानुसार, जाळपोळ करण्यापूर्वी अनेक राऊंडही फायरही केले. पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून पाच मृतदेह बाहेर काढले. राजधानी गुवाहाटीपासून सुमारे 200 किमी अंतरावर ही घटना घडली.

आसाम पोलिसांनी सांगितले की, या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (DNLA) हा अतिरेकी गट असू शकतो. जिल्ह्याच्या एसपींनी सांगितले की, या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी आसाम राइफल्सची मदत घेतली जात आहे.

मे महिन्यात संयुक्त कारवाईत 7 डीएनएलए अतिरेकी ठार झाले

यापूर्वी मे महिन्यात, आसाम राइफल्स आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सात डीएनएलए अतिरेकी ठार झाले होते. नागालँडच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम कर्बी आंगलाँग जिल्ह्यात ही चकमक झाली. सुरक्षा दलांना येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. या दरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल 7 हल्लेखोर ठार झाले. यासह, त्याचे दोन साथीदार चकमकीत गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि 4 एके-47 जप्त करण्यात आले आहेत.

डीएनएलए दिमा हसाओ, पश्चिम कर्बी आंगलाँग जिल्ह्यातील अधिक सक्रिय

या लढाऊ संघटनेच्या प्रमुखांचे नाव नायसोदाव दिमासा आणि सेक्रेटरीचे नाव खर्मिंदाव दिमासा आहे. ही लढाऊ संघटना आसामच्या दिमा हसाओ आणि पश्चिम कर्बी आंगलाँग जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे. यापूर्वी 19 मे रोजी डीएनएलएच्या अतिरेक्यांनी धनसिरी भागात एका तरुणाची हत्या केली होती. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने या भागात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली.

बातम्या आणखी आहेत...