आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:आसाम आता सर्जिकल स्ट्राइकच्या तयारीत, सीमा नसल्याने हिंसक वाद

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या ईशान्येकडील राज्ये म्हणजे आसाम व मिझाराेम. दाेन्ही राज्यांत एकाच पक्षाचे सरकार आहे, परंतु सीमांवरून भारत-पाक सीमेसारखा तणाव वाटताे. पर्यटकांनी गजबजणाऱ्या खाेऱ्यात दहशत दिसते. या राज्यांतील सीमावाद हिंसाचारात रूपांतरित झाल्याने गावागावांतून पलायन हाेत आहे. आसाममध्ये दाेलाखाल, कचूरथल, जुफाई, मैदिनी, फायसनेसारख्या भागात पक्के रस्ते तयार केले जात आहेत. मिझाेरामने १६ किमी क्षेत्र ताब्यात घेतल्याचा आराेप आसामने केला आहे.

आसाम-मिझाेराम संघर्षात ६ पाेलिस शहीद झाले. आता आसाम पाेलिसांनी हल्ल्यात सामील असलेल्यांचा तपास हाती घेतला आहे. त्याची माहिती मिळाल्यास पाेलिस मिझाेराममध्ये माेठी कारवाई करू शकते. धाेलाईचे आमदार व वनमंत्री परिमल शुक्ला वैद्य बंकर निर्माण करणे व सर्जिकल स्ट्राइकसारख्या कारवाईची पुष्टी करतात. गुप्तचर काम करत आहेत. दाेषींना शिक्षा मिळेल. त्यामुळे मिझाेरामने राज्यात पाेलिसांची तैनाती वाढवली आहे. आसामने कारवाई केल्यास त्याला चाेख प्रत्युत्तर दिले जाईल. लाेकांचाही राज्याला पाठिंबा आहे. मिझाेरामचे निवृत्त सैनिक छुआना म्हणाले, ४ लाख घुसखाेर आसामच्या खाेऱ्यातील करीमगंज, कछार, हायलाकांडी जिल्ह्यातील वनक्षेत्रात दडून बसले आहेत. घुसखाेरीच्या समस्येवर सर्वाेच्च न्यायालयाने हजारिका आयाेगाचे अध्यक्ष उपमन्यू हजारिकाने काेर्टाला अहवाल सादर केला.

त्यानुसार घुसखाेर मिझाेराममध्ये गुन्हेगारी कृत्य करतात आणि आसामी बनतात. आसाममध्ये असे कृत्य केल्यास ते मिझाेरामसारखे वागतात. गाेळीबाराच्या प्रत्यक्षदर्शी तिलक म्हणाले, आसाम पाेलिसांनी मिझाेरामच्या शिपायांना थापड मारून पळवले हाेते. त्यानंतर दाेन्ही राज्यांतील पाेलिसांनी माइक लावून आवाहन केले. लाेकांनी घराबाहेर येऊन पाेलिसांशी लढावे, असे ते आवाहन हाेते. जमीन साेडवण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा, असे पाेलिसांनी सांगितले हाेते. मिझाेराममध्ये ८ महिन्यांनंतर निवडणूक आहे. हा निवडणुकीचा खेळ असल्याचे काँग्रेस प्रवक्ते संजीव राॅय यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...