आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam Law Against Cheating To Marry To Be Equal For Hindus And Muslims Himanta Biswa Sarma Announced; News And Live Updates

आसाममध्येदेखील लव्ह जिहादसारखा कायदा:धर्म लपवून लग्न करणार्‍यांविरोधात कायदा आणणार आसाम सरकार; हिंदू आणि मुस्लिम दोघांना कायदा लागू होणार - मुख्यमंत्री

गुवाहाटी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यामुळे फसवणूक करुन हिंदूदेखील लग्न करणार नाही - मुख्यमंत्री

भाजपप्रणीत आसाम सरकार लव्ह जिहादसारखा कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. हा कायदा धर्म लपवून लग्न करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई आणि लक्ष ठेवण्यासाठी आणणार असल्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले आहे. हा कायदा केवळ लव्ह जिहाद म्हणून ओळखला जाणार नाहीतर हिंदू आणि मुस्लिम दोघांना लागू असेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

यामुळे फसवणूक करुन हिंदूदेखील लग्न करणार नाही - मुख्यमंत्री
हा कायदा लागू झाल्यानंतर कोणताही हिंदू पुरुष आपली ओळख लपवून दुसऱ्या हिंदू महिलेशी लग्न करणार नाही असे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आम्ही यासाठी लव्ह जिहाद शब्दाचा वापर करणार नाही. कारण केवळ एखादा मुस्लीम व्यक्ती हिंदू महिलेची फसवणूक करुन लग्न करतो म्हणजे तोच लव्ह जिहाद असा होत नाही. जर हिंदू पुरुषही असे करत असेल तर तोदेखील लव्ह जिहाद असल्याचे मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे अशा घटना थांबतील असेही ते म्हणाले.

आता 10 राज्यांत लव्ह जिहादविरोधात कायदे

  • देशातील धर्मांतरणाच्या घटना थांबवण्यासाठी 10 राज्यांत लव्ह जिहादविरोधात कायदे तयार करण्यात आले आहे. सर्वात आधी हा कायदा तामिळनाडू राज्याने लागू केला आहे. परंतु, त्याने 2003 मध्ये रद्द केले.
  • हा कायदा सध्या देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लागू आहे. तर दुसरीकडे हिमाचल, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये 5 वर्षांपर्यंत तुरूंगवासाची तरतूद आहे.
  • एससी-एसटी आणि अल्पवयीन वयाच्या बाबतीत ही शिक्षा 7 वर्षे आहे. उत्तर प्रदेशातही कायदा तयार करण्यात आला असून गेल्या महिन्यातच हा अध्यादेश मंत्रिमंडळात मंजूर झाला होता. या कायद्यानुसार जबरदस्तीने धर्मांतरासाठी 10 वर्षांपर्यंत तुरूंगवासाची तरतूद आहे.
बातम्या आणखी आहेत...