आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam Meghalaya Reconciled After 50 Years, Border Dispute Finally Over 7 Seats Union Home Minister Amit Shah|Marathi News

पूर्वोत्तरसाठी ‘ऐतिहासिक दिन’:आसाम-मेघालयामध्ये 50 वर्षांनंतर समेट, अखेर 7 जागांवर सीमावाद संपुष्टात -  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाम व मेघालयात मंगलवारी १२ पैकी सहा ठिकाणांबाबत असलेल्या सीमावादावर समेट घडवून आणणाऱ्या दस्तऐवजावर सामंजस्य करार झाला. हा वाद ५० वर्षांपासून सुरू होता. पूर्वोत्तरसाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.या करारावर शहा यांच्याव्यतिरिक्त मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा व मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. करारामुळे आता उभय राज्यांतील ८८४.९ किमी सीमेसह १२ ठिकाणांपैकी सहा ठिकाणांवरील वाद संपुष्टात येईल. गृह मंत्रालयातील करारानंतर शहा म्हणाले, करारामुळे दोन्ही राज्यांत आता ७० टक्के सीमावादाची सोडवणूक झाली आहे.

१९७२ मध्ये वादंगाला सुरुवात
मेघालयाची स्थापना १९७२ मध्ये आसाममधून बाहेर पडून झाली होती. परंतु नव्या राज्यामुळे आसामच्या पुनर्स्थापना अधिनियम १९७१ ला आव्हान दिले होते. त्यातून सीमेवरील बारा भागांवर वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर दोन्ही राज्यातील नागरिकांना त्यातही सीमेवरील लोकांना हे त्रासाचे झाले होते.

३६.७९ वर्ग किमीच्या भागावर करार
करार झालेल्या सहा ठिकाणांत ३६ गावे येतात. हे क्षेत्र ३६.७९ चौरस किमीचे आहे. दोन्ही राज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सीमावाद सोडवण्यासाठी प्रत्येकी तीन समित्यांची स्थापना केली होती. पॅनचे शर्मा, संगमा यांच्यात दोन फेऱ्यांत चर्चा झाली होती. समितीद्वारे संयुक्त अंतिम शिफारशीनुसार पहिल्या टप्प्याची सोडवणूक करण्यासाठी ३६.७९ चौरस किमीच्या वादग्रस्त क्षेत्रात आसामला १८.५१ चौरस किमी व मेघालयास १८.२८ चौरस किमीवर पूर्ण नियंत्रण मिळणार आहे. आसाम व मेघालयातील वाद १२ बिंदूंवर आहे. त्यापैकी कमी महत्त्वाच्या सहा क्षेत्रांचा पहिल्या टप्प्यात समावेश झाला.

बातम्या आणखी आहेत...