आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Assam Mizoram Border Dispute Mizoram Police Lodged An Official Complaint Against Hemant Biswasarma

आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात FIR:मिझोरम पोलिसांनी हेमंत बिस्वासरमाविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली; हत्येचा प्रयत्न आणि कट रचण्याचे कलम लावले

गुवाहाटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा वादात मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वसरमा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या व्यतिरिक्त, 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आसामच्या 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 200 अज्ञात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) जॉन नेहलिया यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, या सर्वांवर खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी षडयंत्रासह अनेक आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा कोलासिब जिल्ह्यातील वैरेंगटे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला.

IG, DIG यांच्यावरही FIR
नेहलिया म्हणाले की, ज्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यामध्ये आसामचे पोलीस IG अनुराग अग्रवाल, DIG देवज्योती मुखर्जी, कचरचे SP चंद्रकांत निंबाळकर आणि धोलाई पोलीस ठाण्याचे प्रभारी साहब उद्दिन यांचा समावेश आहे. कछार उपायुक्त कीर्ती जल्ली आणि कछार विभागीय वन अधिकारी सनीदेव चौधरी यांच्यावरही याच आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी हिंसाचार भडकला
दोन्ही राज्यांमधील सीमावाद अनेक दशकांपासून सुरू आहे. या आठवड्यात उफाळून आलेल्या वादाला नवे रूप प्राप्त झाले आहे. सोमवारी या राज्यांच्या सीमावर्ती भागात हिंसाचार उसळला, ज्यामध्ये आसामचे सहा पोलिस ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसा भडकवल्याचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...