आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भीषण आग:असाममध्ये ऑईल इंडियाच्या विहिरीत आग; 2 फायर फायटरचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

तिनसुखिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीने म्हटले- आग बिझविण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ लागेल
  • विहिरीत मागील 14 दिवसांपासून गॅस लीक, मंगळवारी लागली आग
Advertisement
Advertisement

असामच्या तिनसुखिया जिल्ह्यातील बाघजनमध्ये ऑईल इंडियाच्या तेलाच्या विहिरीत मंगळवारी भीषण आग लागली. विहिरीत मागील 14 दिवसांपासून गॅस लीकेज सुरू होते. या भीषण आगीत 2 फायर फायटर्सचा मृत्यू झाला आहे. ऑइल इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग विझविण्यासाठी 4 आठवड्यांचा वेळ लागेल.

कंपनीचे प्रवक्ते त्रिदेव हजारिका यांनी सांगितल्यानुसार, आग लागताच बेपत्ता झालेल्या दोन फायर फायटर्सचे मृतदेह बुधवारी सकाळी सापडले. मृतदेहांवर जळाल्याचे निशान नव्हते, त्यामुळे आग लागताच कर्मचाऱ्यांनी विहिरीत उड्या मारल्याने मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. पोस्ट मॉर्टमनंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल.

पीडित कुटुंबांना 30 हजारांची मदत

आग विझविण्याच्या कामात लागलेला ओएनजीसीचा एक फायर फायटर गंभीर भाजला आहे. ही आग इतकी भयंकर होती की 10 किलोमीटरपासून  ज्वाळा दिसू लागल्या. आजूबाजूच्या दीड किमी क्षेत्रात राहणा 6,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ऑईल इंडियाने प्रत्येक बाधित कुटुंबाला 30 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
0