आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाम पोलिसांनी गुरुवारी अल कायदा (AQIS) व अंसारुल्लाह बांग्ला टीम (ABT) या 2 अतिरेकी संघटनेच्या 11 संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांना मोरीगाव, बारपेटा, गुवाहाटी व गोलपारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी मोरीगावच्या सहरीयागावमधील जमीउल हुडा मदरशाची इमारती सील केली आहे. हे ताब्यात घेण्यात आलेल्या अतिरेक्यांचे आश्रयस्थान होते. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस व आक्षेपार्ह दस्तावेजही जप्त करण्यात आलेत.
तपास यंत्रणेचा प्रदिर्घ तपास
पोलिसांनी सांगितले की, एका संशयिताला कोलकात्यातून, दुसऱ्याला आसामच्या बारपेटातून अटक करण्यात आली. त्यांचा टेरर फंडिंग व देशविरोधी कारवायांत हात होता. सध्या या अतिरेक्यांच्या बँक खात्यांची पडताळणी केली जात आहे.
दुसरीकडे, आसामच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी आसाम पोलिस व केंद्रीय तपास यंत्रणा प्रदिर्घ काळापासून या मोहिमेवर कार्यरत होत्या असे स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आसाम पोलिसांनी बुधवारी अतिरेक्यांच्या एका स्लीपर सेलचा भांडाफोड केला होता. या स्लीपर सेलने बांग्लादेशी अतिरेक्याला आपल्या घरात आश्रय दिला होता.
मोरीगावचा एक मदरसा सील -पोलिस
मोरीगावच्या पोलिस अधीक्षक अपर्णा एन यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या अतिरेक्यांचा अंसारुल्लाह बांग्ला टीम व अल कायदाशी संबंध आहे. पोलिसांनी मोरीगावच्या सहरीयागावातील जमीउल हुडा मदरशाची इमारतही सील केली आहे. हे अतिरेकी या इमारतीत आश्रय घेत होते. सध्या त्यांची लिंक शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एसपी म्हणाल्या -'आम्हाला मुस्तफा नामक एका व्यक्तीकडून माहिती मिळाली. हा व्यक्ती मोरीयाबारीत एक मदरसा चालवतो. या ठिकाणी राष्ट्रविरोधी कृत्य होतात. या व्यक्तीचा भारतातील अल कायदाशी संबंधित एबीटीच्या फंडिंगशीही संबंध आहे. या सर्वांविरोधात यूएपीएच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
अंसारुल्लाह बांग्ला टीमची मुळे अनेक देशांत पसरली
अतिरेकी संघटना अंसारुल्लाह बांग्ला टीमची मुळे अनेक देशांत पसरली आहेत. एका वृत्तानुसार, अतिरेकी पाक व बांग्लादेश मार्गे भारताच्या विविध राज्यांत पोहोचतात. पण अनेकदा सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचा कट फसतो.
आसामच्या अनेक जिल्ह्यांतही पोलिस व सुरक्षा दल सक्रिय आहेत. गुप्तहेर माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाते. आकडेवारीनुसार, मागील 5 वर्षांत 2021 मध्ये बांग्लादेश व पाकमधून घुसखोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या. तसेच मोठ्या प्रमाणात घुसखोरही पकडण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.