आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:आसाम : आगीमुळे गावे उजाडली तेथे वस्ती अशक्य

आसाम (दिलीपकुमार शर्मा)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आसामात ऑइल इंडियाच्या विहिरीतील आगीचा 17 वा दिवस, चौकशी समिती स्थापन

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील वाघजान गावात ऑईल इंडिया लि.च्या तेलविहिरीत १७ दिवसांपासून गॅस गळतीसह आग लागलेली आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी देश-विदेशातील तज्ञ प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे तेलाच्या विहिरीजवळ असलेले वाघजान गावाची निशाणी आता मिटण्याच्या मार्गावर आहे. गावातील ६०० हून अधिक कुटुंबांना शिबिरात ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भितीने अनेकांनी वृद्धांना नातेवाइकांकडे पाठवून दिले. तर गावकरी अनिश्चितेत दिवस घालवत आहेत. कारण आपल्या घरी परत कधी जाणार‌? याची अनिश्चितता कायम आहे.

३७ वर्षीय लाबोइनया सैकिया आगीत जळून राख झालेल्या घराचे चित्र दाखवून रडू लागते. ११ वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. लाबोइनया यांनी पै-पै जोडून एक छोटेसे घर बांधले. ज्या दिवशी गॅसगळती झाली, लाबोइनया यांच्या घरात विजेच्या जोडणीचे काम सुरू होते. तीन मुलांसह नव्या घरांचे नियोजन करत होत्या.

आता सगळे काही हरवून बसलेल्या लाबोइनया सांगतात, “ २७ मेच्या आधी आमच्या आयुष्यात सगळे काही ठीकठाक होते. त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता स्फोटाचे आवाज आले. पाहता पाहता गावात तेलाचा पाऊस पडू लागला. सगळे जीव मुठीत घेऊन पळू लागले. आता आम्ही बेघर झालो आहोत. आता पुन्हा या गावात राहणे शक्य नाही.’

वाघजान गाव परिस्थितीजन्य दृष्टीने खूप संवेदनशील भागात येते. गावापासून दीड किमी दूर अंतरावर दिब्रू-सैखोवा नॅशनल पार्क आहे. ३४० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला नॅशनल पार्क जगातील जिवंत जंगली प्राण्याचे घर आहे. हे पार्क हूलॉक गिब्बनसाठी वेगळी ओळख जपलेले आहे. हु लॉक गिब्बन हा भारतात आढळणारा एकमेव वानर प्राणी आहे.सरकारी स्तरावर पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणाऱ्या तज्ञांना तेल व गॅसगळतीमुळे स्थानिक परिस्थितीची कधीही न भरून येणारी हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची भरपाई पुढील अनेक वर्षांतही करता येणार नाही.

आसामचे वन व पर्यावरण मंत्री परिमल शुक्लवैद यांनीही पर्यावरणाची अपरिमित हानी झाल्याचे मान्य केले. वाघजानचे ग्राम प्रमुख रजनी हजारिका (७४) यांनी सांगितले, गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातून गॅस काढला जातो.परंतु अशी दुर्घटना कधीही घडलेली नाही. तेल व गॅस गळतीमुळे हिरवेगार गाव उजाड झाले. आता येथे शेतीही होणार नाही आणि लोकांना घरीही राहता येणार नाही.

ऑइल इंडिया व जॉन एनर्जीविरुद्ध एफआयआर

दिब्रुगड / गुवाहाटी |गॅस विहिरीत लागलेल्या आगीवरून ऑयल इंडिया व जॉन एनर्जीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आसाम पोलिसांनी पत्रकार व पर्यावरण तज्ञ अपूर्वा बल्लव गोस्वामी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत आईल इंडियाचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांचीही नावे आहेत. तर केंद्र व आसाम सरकारने दोन वेगवेगळ्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...