आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसामच्या मदरशांमध्ये जिहादी नेटवर्क सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने अशा 700 शिक्षण संस्था बंद करून टाकल्या आहेत. दहशतवादी नेटवर्क संपवण्यासाठी आणि मुलांना त्यापासून वाचवण्यासाठी सरकारने खासगी मदरशांवर नियंत्रण ठेवणारा कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या म्हणण्यानुसार दहशतवादी संघटना अल-कायदा आसाममध्ये हिंसाचार घडवण्याचा कट आखत आहे.
राज्यातील सर्व मदरशांच्या नोंदणीसाठी लवकरच नवा कायदा आणला जाणार आहे. या विषयात राज्य सरकार कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. गुप्तचर यंत्रणा आणि पकडलेल्या लोकांच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. अल्पसंख्याक समुदायातील तरुण पिढी या संघटनांच्या रडारवर आहे. या पिढीची दिशाभूल करण्यासाठी बांगला भाषेत अनुवादित जिहादी साहित्य मोबाइलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहे. अटकेतील जिहादींपैकी अनेकांनी इमाम म्हणून काम केले होते. दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते अनेक ठिकाणी धार्मिक मेळेदेखील आयोजित करतात. अशा मदरशांना बेकायदा निधी मिळत असल्याचीदेखील माहिती आहे.
त्रिपुरा, बंगळुरू, भोपाळपर्यंत तार..
दोन डझन जिहादी मॉड्यूल अटकेत आहेत. आसामच्या मदरशातील जिहादी अन्सार उल्ला बांगला टीम व अल-कायदाशी जोडलेले आहेत. या संघटनांच्या मॉड्यूलचे तार त्रिपुरा, भोपाळ, बंगळुरूशी देखील जोडलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.