आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसामच्या आयएएस अधिकारी सेवाली देवी शर्मासह तिघांना अजमेरमधून अटक करण्यात आली आहे. त्यात त्यांचा एक जावाई देखील आहे. दरम्यान सेवालीच्या मोलकरणीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. आसामच्या दक्षता पथकाने सोमवारी सकाळी अजमेरच्या कोतवाली पोलिस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई केली.
टीम आसामला रवाना
आसामच्या स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एससीईआरटी) मध्ये 105 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी फरारांना पकडण्यासाठी टीम अजमेर येथे आली होती. तिघांनाही येथील सीजीएम न्यायालयात हजर करून कोठडी सुनावण्यात आली. यानंतर टीम त्यांच्यासोबत आसामला रवाना झाली आहे.
रात्री टीम अजमेरला पोहोचली
रविवारी रात्री उशिरा आसाम व्हिजिलन्सचे विशेष पथक निरीक्षक प्रीतम सेकिया यांच्या नेतृत्वाखाली अजमेरला पोहोचले. प्रीतम यांनी सांगितले की, रविवारी रात्रीच टीम अजमेरला पोहोचली होती. कोतवाली पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आल होता. त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितले. आरोपी अजमेर येथे असल्याची माहिती मिळाली. सोमवारी सकाळी आसाम दक्षता पथक आणि कोतवाली पोलिसांनी स्थानाच्या आधारे सेवाली देवी शर्मा, जावई अजित पाल सिंग आणि राहुल अमीन यांना हॉटेल क्रॉस लेन, जयपूर रोड येथून अटक केली. राहुल आणि अजित पाल हे दोघे कंत्राटदार आहेत.
वर्क ऑर्डरशिवाय पैसे काढले
सेवाली देवी शर्मा 2017-2020 दरम्यान SCERT मध्ये होत्या. असा आरोप आहे की, त्यांनी सरकारच्या संमतीशिवाय 5 बँक खाते उघडले. यात 100 कोटींहून अधिक घोटाळ्यांचा आरोप आहे. या घोटाळ्यात त्यांच्या जावईचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. जावई कंत्राटदार आहे. कोणत्याही वर्क ऑर्डरशिवाय 105 कोटी रुपये काढल्याचा आरोप आयएएस अधिकाऱ्यावर आहे.
1992 च्या बॅचच्या अधिकारी
सेवाली देवी शर्मा या 1992 कॅडरच्या अधिकारी आहेत. त्यांनी बीए आणि एलएलबी केले आहे. आता सरकार या घोटाळ्याच्या प्रकरणाची कडक चौकशी करत आहे. या संदर्भात सध्या विशेष पथक चौकशी करत आहे. यापूर्वी हे प्रकरण उघडकीस येताच सरकारने सेवालीदेवी यांना निलंबित केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.