आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाममधील नागाव आणि मोरीगाव जिल्ह्यातून पाकिस्तानी दलालांना सिमकार्ड पुरवल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून अनेक मोबाईल फोन, सिमकार्ड आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ज्यात परदेशी दूतावासांशी संरक्षण माहिती सामायिक करण्यासाठी वापरल्या जाणार्या हँडसेटचा समावेश आहे. ही माहिती पोलिसांनी दिली.
आसाम पोलिसांचे प्रवक्ते प्रशांत भुईया यांनी सांगितले की, इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईदरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
पुढे ते म्हणाले, या दोन जिल्ह्यांतील सुमारे 10 लोक फसवणूक करून अनेक कंपन्यांचे सिमकार्ड मिळवत आणि काही पाकिस्तानी एजंटांना पुरवत असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. अशा प्रकारे हे लोक राष्ट्राच्या अखंडतेच्या आणि सार्वभौमत्वाच्या विरोधात काम करत होते.
आरोपींना मंगळवारी रात्री अटक
या पाच आरोपींना मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आशिकुल इस्लाम, बोडोर उद्दीन, मिझानुर रहमान आणि नागाव येथील वहीदुज जमान आणि मोरीगाव येथील बहरुल इस्लाम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आणि इतर पाच फरार आरोपींच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या सामानात पाच 18 मोबाईल फोन, 136 सिमकार्ड, फिंगरप्रिंट स्कॅनर, एक हायटेक सीपीयू आणि जन्म प्रमाणपत्र, पासबुक आणि छायाचित्रे यासारखी काही कागदपत्रे यांचा समावेश आहे.
दोन आयएमईआय नंबर असलेला मोबाईल हँडसेट
चौकशीदरम्यान, आशिकुल इस्लाम हा दोन आयएमईआय क्रमांकांसह मोबाइल हँडसेट वापरत होता. ज्यावरून व्हॉट्सअॅप कॉल केला जात होता. परदेशी दूतावासाशी संरक्षणाची माहिती सामायिक करत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून तो खास मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या इतरांचाही या संबंधात तांत्रिकदृष्ट्या सहभाग आढळून आला आहे. आयबीच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.