आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर पंडित राहुल भटची हत्या:सरकारी कार्यालयात घुसून काश्मिरी पंडिताची हत्या

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीरमध्ये हत्येच्या निषेधार्थ काश्मिरी पंडितांनी रास्ता रोको केला. - Divya Marathi
काश्मीरमध्ये हत्येच्या निषेधार्थ काश्मिरी पंडितांनी रास्ता रोको केला.

अतिरेक्यांनी गुरुवारी बडगाम जिल्ह्यात चडुरामध्ये सरकारी कार्यालयात घुसून काश्मीर पंडित राहुल भटची हत्या केली. महसूल विभागात लिपिक पदावर कार्यरत भट यांच्यावर अतिरेक्यांनी खूप जवळून गोळ्या झाडल्या. दुपारी सर्व कर्मचारी काम करत होते त्यावेळी दोन अतिरेकी घुसले आणि राहुल यांच्या टेबलजवळ जाऊन हल्ला केला. अतिरेक्यांनी यादरम्यान पळ काढला. हल्ल्यात जखमी राहुल यांना श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात हलवण्यात आले. यादरम्यान राहुल यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...