आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळचा कन्नूर जिल्हा कम्युनिस्ट पक्षाची जन्मभूमी आहे. भारतात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जन्म येथेच पारापरम गावात १९३९ मध्ये झाला. त्याच्या जवळच मुख्यमंत्री विजयन यांचे गाव पिनराई आहे. आता हे गाव कमी व शहर जास्त वाटते. विजयन त्यांच्या नावापुढे त्यांच्याच गावाचे नाव पिनराई लिहितात. मुख्यमंत्र्यांचे पिनराई गाव व कम्युनिस्ट पक्षाची जन्मभूमी पारापरम गाव कन्नूरच्या धर्मदम मतदारसंघात आहेत. विजयन येथूनच निवडणूक लढवत आहेत. सध्या पूर्ण कन्नूर सीपीएमचे झेंडे, पोस्टर व विजयन यांच्या फलकांनी रंगलेले आहे. धर्मदममध्ये तर विजयन आणि सीपीएमच्या पोस्टरशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. हा कोठे कोठे काँग्रेस व भाजपची हजेरी आहे. येथे जेवढे बस थांबे व इमारती आहेत, सर्व लाल रंगात आहेत. धर्मदमचे सिवान सांगतात की, भाजप व काँग्रेस येथे नावापुरतेच लढत आहेत. दोघांना येथून उमेदवार शोधायला जड गेले.
विजयन यांच्या गावात सध्या मुलीच्या लग्नासारखे वातारण आहे. सीपीएम कार्यकर्ते तनमन धनाने होर्डिंग, पोस्टर, मतदार यादी तयार करत आहेत. त्यांच्यापैकीच एक स्मिथ आहे. तयारीबाबत विचारले असता त्याने सांगितले, ही छत्री बघा, ऊन लागू नये म्हणून कार्यकर्त्यांना पाठवली जात आहे. आज शहरात कॉ. विजयन यांची रॅली आहे, संध्याकाळी येथेही येणार आहेत.
पिनराई यांच्या घरापासून सुमारे किमी अंतरावर आणि सीपीएम कार्यालयापासून फक्त २०० मीटर लांब असे एक घर आहे, जेथे एक म्हातारी आई एकटीच राहते. तिच्या डोळ्यातील अश्रू गेल्या १८ वर्षांपासून थांबायचे नाव घेत नाहीत. तिचे नाव के. सी. नारायणी आहे. नारायणीने आधी पती गमावला व एकटा मुलगा. नारायणी सांगते, २००२ मध्ये सीपीएमच्या लोकांनी पतीला चालत्या बसमध्ये ठार केले, कारण ते संघात होते. नंतर २०१६ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर सीपीएमच्या लोकांनी रस्त्यावरच मुलाला ठार केले. त्याचा संघाशी संबंध नव्हता.
कन्नूर राजकीय हिंसाचाराची राजधानी; ५ वर्षांत ३४ बळी
कन्नूरला भारतीय राजकारणातील हिंसाचाराची राजधानीही म्हटले जाते. ७०च्या दशकात येथे राजकीय हिंसाचार सुरू झाला, तो अजूनही सुरूच आहे. ५ वर्षांत ३४ जणांचा जीव गेला आहे. याबाबत केरळचे संघ चालक अॅड. के. के. बलराम म्हणतात, संघाने १९४०पासून केरळमध्ये कामाला सुरुवात केली. तेव्हापासून सीपीएम संघाकडे वाईट नजरेने बघत आहेत. जेथे आम्ही शाखा काढतो तेथे सीपीएम हल्ला करतो. यामुळे हिंसाचार वाढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.