आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रक्रियेअंतर्गत मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. अासाममध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ७९% मतदान झाले. तामिळनाडूच्या सर्व २३४ जागांवर एकाच टप्प्यात ६३.४७% मतदान झाले. केरळच्या सर्व १४० जागांवर ७४% आणि पुद्दुचेरीच्या सर्व ३० जागांवर ७७.९०% मतदान झाले. यासोबतच या सर्व राज्यांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये किरकोळ हिंसाचारादरम्यान ७७.६८% मतदान झाले. तेथे अद्याप निवडणुकीचे पाच टप्पे बाकी आहेत. निकाल २ मे रोजी लागणार आहेत.
बंगालमध्ये अद्याप ५ टप्प्यांतील २०३ जागी मतदान होणे बाकी आहे. राज्यात एकूण २९४ जागा आहेत. पैकी ३१ जागी तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. निवडणूक अायाेगाने या सर्व जागा संवेदनशील मानून कलम १४४ लागू केले होते. या टप्प्यात सर्वाधिक ८४.७१% मतदान गाेघाट जागेवर झाले. राज्यात काही ठिकाणी किरकोळ वादावादी व हिंसाचार झाला. तृणमूल आणि भाजप उमेदवारांवर हल्ले झाले. भाजप खासदार साैमित्र खान यांच्या विभक्त पत्नी व तृणमूलच्या उमेदवार सुजाता मंडल खान यांनी अारामबागमध्ये आपल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला. भाजपने सुजातांवर मतदारांना धमक्या देण्याचा आरोप केला. अायाेगाने घटनेचा अहवाल मागवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.