आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • At The Age Of 43 Became  Chairman Of Tata Group | Removed From The Post Of President | Know Who Is Cyrus Mistry

सायरस 43 व्या वर्षी बनले टाटा समूहाचे अध्यक्ष:2016 साली झाली हकालपट्टी, जाणून घ्या सायरस मिस्त्री यांचा जीवन प्रवास

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पालघरच्या चारोटी येथे अहमदाबाद-मुंबई महामार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जीवन प्रवासाची थोडक्यात माहिती घेऊया...

वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले. 1887 साली स्थापन झालेल्या 'टाटा सन्स ' ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. 2012 ते ऑक्टोबर 2016 दरम्यान ते या पदावर होते. टाटा सन्सचे 18 टक्के भांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत.

मिस्त्रींची बहीण टाटा घराण्यात

रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री यांनी 29 डिसेंबर 2012 रोजी कार्यभार हाती घेतला. सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी आणि कंपनीमध्ये 1991 साली संचालक म्हणून दाखल झाले. सायरस यांचे त्यांचे वडील पालनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे.

कोण आहेत सायरस मिस्त्री

सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी कुटुंबातील आहेत. शापूरजी हे पालोनजी समूहाच्या टाटा सन्सच्या होल्डिंग कंपनीतील सर्वात मोठे खाजगी भागधारक आहेत. मिस्त्री यांची 2006 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. इतर अनेक समूह कंपन्यांमध्येही त्यांनी नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे भूषवली आहेत. यावेळी टाटा सन्सचे संचालक मिस्त्री आणि टाटा अॅलेक्सी (भारत) हे देखील रतन टाटा यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय निवड समितीमध्ये होते.

लंडनमधून पदवी

मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये झाले. इंपीरियल कॉलेज लंडनमधून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून पदव्युत्तर पदवी (व्यवस्थापन) घेतली आहे. ते इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर्सशी संलग्न आहे.

वकिल इक्बाल छागलांच्या मुलीशी लग्न

सायरस मिस्त्री पालोनजी मिस्त्री, उद्योगपती आणि पॅटसी पेरिन दुबाश यांचे सर्वात धाकटा मुलगा आहे. मिस्त्री प्रसिद्ध वकिल इक्बाल छागला यांची मुलगी आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एम. सी. छागला यांची नात रोहिका बागला यांच्याशी लग्न केले.

ब्रीचकँडी हॉस्पिटलचे विश्वस्त

1991 नंतर शापूरजी पालोनजी ग्रुपला नवीन उंचीवर नेण्याचे श्रेय मिस्त्री यांना जाते. सुमारे 23000 कर्मचारी असलेल्या या कंपनीचे कार्य भारत तसेच आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये पसरलेले आहे. मिस्त्री हे कंस्ट्रक्शन फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य आहेत. ते ब्रीचकँडी हॉस्पिटल ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत.

टाटा-मिस्त्री वाद

शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये 18.37 टक्के भागीदारी आहे. रतन टाटा यांच्या जागी पालोनजी मिस्त्री यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना 2012 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते, परंतु चार वर्षांनंतर 2016 मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांचे टाटा समूहाशी मतभेद होते. हे प्रकरण कोर्टातही पोहोचले होते ज्याने टाटांच्या बाजूने निकाल दिला होता.

बातम्या आणखी आहेत...