आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौहार्दतेचे चित्र:गुरुद्वाऱ्यात मुस्लिम बांधवांनी अजान देत नमाज अदा केली, रोजाही सोडला

मालेरकोटलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईदच्या आदल्या दिवशी गुरुद्वारात सौहार्दतेचे चित्र

पंजाबच्या मालेरकोटलामधील प्रमुख गुरुद्वाऱ्यात रविवारी रोजा इफ्तार पार्टी झाली. मुस्लिम बांधवांनी गुरुद्वाऱ्यात रोजा सोडला. अजान दिल्यानंतर नमाजही अदा केली. या गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी नरिंदरसिंग यांनी सर्वांच ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुफ्ती इर्तिका उल-हसन-कादिल-बी म्हणाले, मालेरकोटलात ही परंपरा १४ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. श्री गुरुगोविंदसिंगजी यांच्या छोटे साहिबजाद्यांना मोगलांनी इमारतीच्या पायामध्ये गाडले होते. या घटनेच्या विरोधात मालेरकोटलाचे नवाब शेरखान यांनी येथेच ‘हा’ चा नारा दिला होता. ‘हा’ म्हणजे, हक्कासाठी आवाज. यामुळे गुरुद्वाऱ्याला ‘हा दा नारा’ हे नाव मिळाले. शेरखान मोगल सेनापती होते, मात्र साहिबजाद्यांच्या हत्येनंतर ते माेगलांच्या विरोधात गेले.

बातम्या आणखी आहेत...