आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Atal Bihari Vajpayee Second Death Anniversary President Kovind And PM Modi Paid Tribute

वाजपेयींची दुसरी पुण्यतिथी:राष्ट्रपती, पंतप्रधानांनी ‘सदैव अटल’ जाउन दिली वाजपेयींना श्रद्धांजली, व्हिडिओ जारी करून मोदी म्हणाले- विकासासाठी त्यांचे प्रयत्न देशाच्या स्मरणात राहतील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी
  • 16 ऑगस्ट 2018 रोजी प्रदीर्घ आजाराने झाले अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सदैव अटल या समाधी स्थळी जाउन श्रद्धांजली दिली.

पीएम मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर वाजपेयींचा फोटोंचा एक व्हिडिओ जारी केला. त्यावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वाजपेयींना श्रद्धांजली वाहताना त्यांनी विकासासाठी केलेले प्रयत्न सदैव देशाच्या स्मरणात राहतील असे पंतप्रधान मोदी यांनी लिहिले.

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान

अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान बनले होते. 16 ऑगस्ट 2018 रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेस नेते होते. अटल बिहारी वाजपेयी 1996 मध्ये 13 दिवस, 1998 मध्ये 13 महिने आणि त्यानंतर 1999 मध्ये पूर्ण 5 वर्षे पंतप्रधान पदावर होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंतिम संस्कारात मोदी जवळपास 5 किमी पायी राष्ट्रीय स्मृती स्थळावर पोहोचले होते.

पंतप्रधान होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात 11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरण अणु चाचणी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...