आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:UP पोलिस अतिकसह प्रयागराजला रवाना, उमेश हत्याकांडाप्रकरणी होणार चौकशी; गँगस्टर म्हणाला - मला मारण्याचा डाव

प्रयागराज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
UP पोलिस पुन्हा एकदा अतिक अहमदला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून रस्तेमार्गाने उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नेत आहेत.  - Divya Marathi
UP पोलिस पुन्हा एकदा अतिक अहमदला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून रस्तेमार्गाने उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नेत आहेत. 

गँगस्टर अतिक अहमदला घेऊन उत्तर प्रदेश पोलिस मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास प्रयागराजच्या दिशेने रवाना झालेत. त्याला 16 दिवसांत दुसऱ्यांदा रस्ते मार्गाने यूपीला नेले जात आहे. त्याची उमेश पाल हत्याकांडाप्रकरणी चौकशी सुरू आहे. तुरुंगाबाहेर अतिक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला - माझी प्रकृती चांगली नाही. मला मारण्यासाठी घेऊन जात आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, अतिकची तुरुंगात वैद्यकीय तपासणी झाली. त्यात तो तंदुरुस्त आढळला आहे. प्रयागराजला नेताना अतिक पोलिस व्हॅनमध्ये जवळास 1300 किमीचे अंतर कापेल. या प्रवासाला 22 ते 24 तास लागतील. तत्पूर्वी, 26 मार्च रोजी पोलिसांनी अतिकला प्रयागराजला नेले होते. तेव्हा उमेश पाल अपहरण प्रकरणात त्याची कोर्टात पेशी होती. त्यात अतिकला जन्मठेप ठोठावण्यात आली होती. शिक्षा सुनावल्यानंतर त्याला पुन्हा साबरमती तुरुंगात परत नेण्यात आले होते.

अतिकने व्हॅनमध्ये बसल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्याने गतवेळसारखे यावेळीही आपली हत्या होण्याचा संशय व्यक्त केला आहे.
अतिकने व्हॅनमध्ये बसल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्याने गतवेळसारखे यावेळीही आपली हत्या होण्याचा संशय व्यक्त केला आहे.

प्रयागराजच्या MP/MLA कोर्टाने उमेश पाल हत्याकांडाच्या चौकशीसाठी आठवड्याभरापूर्वी बी-वॉरंट जारी केला होता. प्रयागराज पोलिसांनी बी-वॉरंट साबरमती तुरुंग प्रशासनाला सुपूर्द केला. आता पोलिस कोर्टात हजर करून चौकशीसाठी त्याची कोठडी मागतील. त्याला किती दिवसांची कोठडी द्यायची हे सर्वस्वी कोर्टावर अवलंबून असेल.

30 हून अधिक कॉन्स्टेबल, 2 जेल व्हॅन

अतिकला रस्ते मार्गाने नेणाऱ्या पोलिस पथकात 2 जेल व्हॅन आहेत. या पथकात 1 इन्स्पेक्टर व 30 कॉन्स्टेबल आहेत. तसेच साध्या वेशातील काही पोलिस कर्मचारीही आहेत. ते सुरक्षेच्या कारणास्तव अतिकच्या ताफ्यासोबत चालणार आहेत. अतिक 2019 पासून अहमदाबादच्या साबरमती कारागृहात बंद आहे.

यूपी पोलिस ज्या व्हॅनमधून अतिकला घेऊन जात आहेत, त्याला बायोमेट्रिक लॉक आहे. म्हणजे काही निवडक अधिकारीच या व्हॅनचे गेट उघडू शकतात.
यूपी पोलिस ज्या व्हॅनमधून अतिकला घेऊन जात आहेत, त्याला बायोमेट्रिक लॉक आहे. म्हणजे काही निवडक अधिकारीच या व्हॅनचे गेट उघडू शकतात.

एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही - उपमुख्यमंत्री

अतिकला प्रयागराजला आणण्याविषयी यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले – न्यायालयाच्या सर्वच आदेशांचे पालन केले जाईल. उत्तर प्रदेशात एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. आमचे पोलिस सर्व प्रकरणांचा कसून पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक गुन्हेगाराला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी हा आमचा उद्देश आहे.

उमेश पालची घराबाहेर झाली होती हत्या

24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची प्रयागराज येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ, अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, मुलगा असद यांच्यासह संपूर्ण कुटुंबाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अतिकच्या मुलासह त्याचे शूटर्स उमेशवर गोळीबार करताना दिसले होते.

उमेश हा बसप आमदार राजू पाल यांच्या हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होता. तर अतिक हा राजू पाल हत्याकांडातील आरोपी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अतिकने आपल्या कुटुंबीयांसोबत संगनमत रचून या हत्येचा कट रचला. हत्येपासून असद फरार आहे. त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीस आहे.

16 दिवसापूर्वी अतिकला प्रयागराजला आणण्यात आले होते. जवळपास 1300 किमीच्या या प्रवासात अतिकचा ताफा 8 वेळा थांबला होता.