आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी राजधानी लखनऊत दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली. त्यांचा संबंध अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित “अन्सार गजवातुल हिंद’शी आहे.
पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवरून अल-कायदाचा उमर हलमंडी हा म्होरक्या ही संघटना चालवतो. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, पकडलेले संशयित आरोपी मिनहाज अहमद आणि मसरूद्दीन यांनी १५ ऑगस्टपूर्वी लखनऊसह राज्यातील अनेक शहरांत स्फोट घडवण्याचा कट आखला होता. एटीएसचे महासंचालक जी. एस. गोस्वामी यांनी सांगितले, दोघांनी लखनऊत प्रेशर कुकर बॉम्ब तयार करण्यासह १५ ऑगस्टपूर्वी लखनऊ, वाराणसी, प्रयागराज, आग्रा, मेरठ, बरेली व अयोध्येत स्फोट घडवण्याची योजना आखली होती. मानवी बॉम्बच्या माध्यमातून स्फोट घडवण्याच्या तयारीत ते होते. लखनऊत मिनहाजच्या घरी मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत.
म्होरक्या पेशावरमध्ये
पाकिस्तानातील पेशावरममध्ये दडून बसलेला उमर हलमंडी ही संघटना चालवत आहे. तसेच काश्मीरशीही या कटाचा संबंध आहे. लखनऊ व कानपूरमध्येही या लोकांचे हस्तक आहेत.
खासदारांना उडवायची होती योजना
प्रशांत कुमार यांनी सांगितले, अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर भाजपचे काही मोठे नेते होते. भाजपच्या स्थानिक खासदाराला ३ दिवसांत उडवायचे होते. या स्फोटासाठी प्रेशर कुकर बॉम्ब वापरला जाणार होता. हे बॉम्ब जप्त केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.