आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Terrorists Will Attack Amarnath Pilgrims With Sticky Bombs? The Whole Car Will Be Destroyed In 5 10 Minutes, Find Out The Fear Of Sticky Bomb Attack On Kashi Amarnath Yatra, Destroyed In 5 10 Minutes

दिव्य मराठी एक्सप्लेनर:अमरनाथ यात्रेवर स्टिकी बॉम्बचा हल्ला होण्याची भीती, 5-10 मिनिटांत नष्ट होईल संपूर्ण कार, जाणून घ्या कशी?

अभिषेक पांडेय/नीरज सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरनाथ यात्रेवर स्टिकी बॉम्ब हल्ला होण्याचा धोका आहे. गुप्तहेर संघटनांच्या हाती यासंबंधीचे ठोस पुरावे लागलेत. 30 जूनपासून सुरू होणाऱ्या या यात्रेत यंदा 3 लाखांहून अधिक भाविक पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी आपल्या सुरक्षा योजनेत काही बदल केलेत. यंत्रणांनी वाहनांच्या मूव्हमेंटमध्येही मोठे बदल केलेत.

जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असणाऱ्या अतिरेक्यांकडे स्टिकी बॉम्ब आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्यात. हे बॉम्ब कोणत्याही वाहनांना चिकटवून दूरवरून सहजपणे स्फोट घडवून आणता येतो. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धापासून अफगानिस्तानातील तालिबानी अतिरेक्यांपर्यंत सर्वजण त्याचा सर्रास वापर करतात.

त्यामुळे चला तर मग जाणून घेऊया स्टिकी बॉम्ब म्हणजे काय? तो कधी आणि कुठे वापरले? दहशतवादी त्यांचा वापर का करतात? ते भारतात कधी वापरले गेले?

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जारी झाली नवी SOP

गत काही दिवसांत सुरक्षा यंत्रणांनी अतिरेक्यांकडून अनेक स्टिकी बॉम्ब जप्त केलेत. अटक झालेल्या अतिरेक्यांची चौकशी व हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारावर काश्मीरमध्ये सक्रिय असणाऱ्या अतिरेकी संघटनांकडे यापूर्वीच स्टिकी बॉम्ब पोहोचल्याची शक्यता आहे. गत महिन्यात कटराहून जम्मूकडे जाणाऱ्या एका बसवरही या बॉम्बनेच हल्ला झाल्याचा संशय आहे. याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए करत आहे.

गत आठवड्यात पोलिसांनी काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याचा पाकिस्तानी प्लॅन फेल केला होता. पोलिसांनी कठुआ जिल्ह्यातील हरि नगरातील टल्ली हरिया चाक गावालगत एक पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. हा भाग आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 3 किमी अंतरावर येतो. त्या ड्रोनमधून शस्त्रास्त्र व दारुगोळा जप्त करण्यात आला होता. त्यात 7 मॅग्नेटिक किंवा स्टिकी बॉम्बही होते.

या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा रणनितीवर नव्याने काम करणे सुरू केले आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सुरक्षा अधिकाऱ्यांनी भाविक व सुरक्षा दलांच्या वाहनांत अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर सुरक्षादल व भाविकांच्या व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांनाही कोणतेही वाहन बेवारस न सोडण्याचे निर्देश देण्यात आलेत.

काश्मीर रेंजचे आयजी विजय कुमार यांनी सुरक्षा यंत्रणा स्टिकी बॉम्बच्या धोक्याचा निपटारा करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलत आहे. काश्मीरच्या सांबात गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वप्रथम मॅग्नेटिक बॉम्ब आढळून आला होता.

कलम - 370 रद्द झाल्यानंतर प्रथमच अमरनाथ यात्रा

यंदा 30 जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत 3 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. ही यात्रा जवळपास दीड महिना म्हणजे 11 ऑगस्टपर्यंत रक्षाबंधनापर्यंत चालेल. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर प्रथमच ही यात्रा होणार आहे. त्यानंतर सलग 2 वर्षे कोरोनामुळे ही यात्रा बंद होती.

अमरनाथ गुहा दक्षिण काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात 17 हजार फुटांहून अधिक उंचीवरील अमरनाथ पर्वतावर आहे. या गुहेत दरवर्षी नैसर्गिक शिवलिंग तयार होते. अमरनाथ धाम हिंदू धर्माच्या प्रमुख धामांपैकी एक आहे.

काय आहे स्टिकी बॉम्ब?

स्टिकी बॉम्ब एक चिकटणारा बॉम्ब आहे. तो वाहन किंवा अन्य एखाद्या वस्तुवर फेकल्यानतंर आपोआप त्याला चिपकतो. तसेच सुरक्षित अंतरावरुन रिमोटद्वारे त्याचा स्फोटही घडवता येतो किंवा टायमर सेट करुनही त्याचा ब्लास्ट करता येतो.

स्टिकी बॉम्बला मॅग्नेटिक बॉम्बही म्हटले जाते. तो वाहनांना चिकटवला जातो. त्यानंतर सुरक्षित अंतरावरुन किंवा टायमर सेट करुन त्याचा स्फोट घडवून आणला जातो.

स्टिकी बॉम्ब नेहमीच कार, बस किंवा लष्कराच्या वाहनांच्या डिझेल टँकला लावला जातो. यामुळे ब्लास्ट झाल्यानंतर वाहनाच्या चिंधड्या उडतात. या बॉम्बमध्ये 5-10 मिनिटांचे टायमर असते. यामुळे हल्ला करणाऱ्याला पळून जाण्यासाठी मुबलक वेळ मिळतो. वास्तविक स्टिकी बॉम्ब एक प्रकारचा IED आहे.

ब्रिटनमध्ये झाली प्रथम निर्मिती

याला ग्रेनेड, अँटी टँक नंबर -74, S.T. ग्रेनेड किंवा स्टिकी बॉम्ब म्हणूनही ओळखले जाते. तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमध्ये तयार करण्यात आला होता. त्याचे डिझाइन MIR (c) की टीमने तयार केले होते. त्यात स्टुअर्ट मॅक्रे यांचा समावेश होता.

अतिरेकी का वापर करतात?

स्टिकी बॉम्ब खूप स्वस्त असतो. त्यामुळे तो कॅरी करण्यास खूप सोपा असतो. तो तयार करण्यासाठी केवळ 2 हजारांचा खर्च येतो. यामुळेच अतिरेकी त्याचा सर्रासपणे वापर करतात.

स्टिकी बॉम्बचा केव्हा व कुठे वापर झाला?

दुसऱ्या महायुद्धात स्टिकी बॉम्बचा वापर ब्रिटनसह फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व कॅनडाने केला. गत काही दिवसांत इराकमधील अनेक हल्ल्यांतही त्याचा वापर झाला. अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा होण्यापूर्वी तालिबाननेही नाटो सैनिकांविरोधात याचा खूप वापर केला.

2021 पूर्वी नेहमीच अफगाणिस्तानात कारबॉम्बस्फोट झाल्याच्या बात्या येत होत्या. या स्फोटांत स्टिकी बॉम्बचाच वापर केला जात होता. अतिरेकी मुलांच्या माध्यमातून ट्रॅफिक सिग्नल किंवा धार्मिक स्थळांबाहेर उभ्या असणाऱ्या वाहनांत हे बॉम्ब चिकटवत होते. त्यानंतर दूर बसून रिमोटच्या सहाय्याने त्याचा स्फोट घडवून आणत होते.

डिसेंबर 2020 मध्ये स्टिकी बॉम्बच्या हल्ल्यात काबूलचे उप प्रांतीय गव्हर्नरचा मृत्यू झाला होता. राजधानी काबूलमध्येही तालिबान्यांनी या बॉम्बच्या मदतीने अनेक हल्ले केले होते. त्यात अनेक सरकारी अधिकारी मारले गेले होते.

स्टिकी बॉम्बच्या वापरामागे कोणती स्ट्रॅटेजी?

नॅश्नल सेक्युरिटी गार्ड्स म्हणजे NSG च्या माहितीनुसार, गतवर्षी सांबा जिल्ह्यात जप्त करण्यात आलेला स्टिकी बॉम्ब फेब्रुवारी 2012 मध्ये दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेरील कार उडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्टिकी बॉम्बसारखाच होता.

NSG च्या माहितीनुसार, नुकतेच जप्त झालेल्या एका स्टिकी बॉम्बचा आकार शंखासारखा होता. त्यामुळे तो स्थानिक पातळीवर नव्हे तर प्रोफेश्नल पद्धतीने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होते.

NSG च्या मते, स्टिकी बॉम्बचा वापर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात बळी घेण्यासाठी नव्हे तर केवळ भीती पसरवण्यासाठी केला जात आहे. सामान्यतः IED च्या स्फोटात चौफेर नुकसान होते. पण, शंखासारखा आकार असणाऱ्या स्टिकी बॉम्बमुळे यूनि-डायरेक्शनल म्हणजे एकतर्फी स्फोट होतो. म्हणजे बस किंवा कारमध्ये हा बॉम्ब लावल्यानंतर स्फोटाची दिशा आतच्या दिशेने असते. त्यामुळे आसपास जबर नुकसान होण्याऐवजी केवळ त्या गाडीचेच जास्त नुकसान होते.

असे बॉम्ब तयार करण्यात 'अल कायदा'चा हातखंडा

तज्ज्ञांच्या मते, स्टिकी बॉम्ब भारतात तयार होत नाहीत. ते आयातीत असतात. भारतीय उपमहाखंडात अल कायदा ही अतिरेकी संघटना असे स्टिकी बॉम्ब तयार करण्यात तरबेज आहे.

बातम्या आणखी आहेत...