आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये गुरुवारी खलिस्तान समर्थक संघटना ‘वारिस पंजाब दे’ शी संबंधित हजारो लोकांनी बंदुका,तलवारी घेऊन अमृतसरच्या अजनाला ठाण्यावर हल्ला चढवला. संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंहचा निकटवर्तीय लवप्रीतसिंह तुफानच्या अटकेचा विरोध करीत होते. हल्ल्यानंतर पंजाब पोलिसांनी तुफानची सुटका करीत असल्याचे जाहीर केले. ६ पोलिस जखमी झाले. अमृतपालविरोधात एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अजनाला ठाण्यात तुफानसह एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
दबावाखाली पोलिसांनी केली आरोपीची सुटका
हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. गाड्यांमध्ये गुरुग्रंथसाहिबची प्रतही होती. ठाण्यापासून ४०० मी. व १०० मी. दूरवर बॅरिकेड्सजवळ तैनात ८ जिल्ह्यांतील ८०० पोलिसांना धक्काबुक्की केली.लाठ्याकाठ्या मारीत,दगडफेक करून पिटाळले. अजनाला ठाण्यावर कब्जा करीत छतावर चढले. ‘खलिस्तान झिंंदाबाद’च्या घोषणा दिल्या
अमृतपाल म्हणाला... आम्ही काय करू शकतो याचा पोलिस वारंवार अंदाज घेतात, म्हणून आम्ही काय करू शकतो हे दाखवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.