आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील गोरखनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा एक 34 सेकेंदाचा व्हिडिओ उजेडात आला आहे. एका कारमधून तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओत धारदार शस्त्र हाती घेतलेला मुर्तझा नामक हल्लेखोर व त्यामुळे मंदिर परिसरात माजलेली अफरातफरी दिसून येत आहे. मंदिराच्या सुरक्षेत तैनात पीएसीच्या जवानांवर रविवारी सायंकाळी 7.20 च्या सुमारास हा हल्ला झाला. त्यानंतर तिथे तैनात पोलिसांनी पळ काढला होता.
हल्लेखोराने मंदिराच्या मुख्य पश्चिम प्रवेशद्वाराजवळ जवळपास 15 मिनिटे गोंधळ घातला. त्याच्या हातातील शस्त्र पाहून तिथे तैनात पोलिसांनी पलायन केले. पण, अनुराग नामक एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हुशारीने तो पकडला गेला.
योगी घेणार स्थितीचा आढावा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकर घटनास्थळी जाऊन स्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते एक उच्चस्तरीय बैठक घेण्याचीही शक्यता आहे. यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गोरखपूरमध्ये डेरा टाकला आहे.
'अल्लाह हू अकबर'चा नारा देत म्हणाला, मला गोळी घाला
मुर्तझा हातात शस्त्र घेऊन गोरखनाथ मंदिर व पोलिस ठाण्यापुढील रस्त्यावर धावत होता. नागरिक व पोलिस त्याला पाहत होते. यावेळी तो अल्लाह हू अकबरची नारेबाजी करत पोलिसांना आपल्याला गोळी घालण्याचे आव्हान देत होता.
गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेत वाढ
दुसरीकडे, पोलिसांची निष्क्रियता व मंदिराच्या सुरक्षेची पोल खूलताच या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. तसेच मंदिराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी हल्लेखोराचे अतिरेकी कनेक्शन व त्याचा हेतूही तपासून पाहण्यात येत आहे.
डॉ. अब्बासी यांच्या कुटूंबातील सदस्य आहे मुर्तझा
संशयित मुर्तझा अहमद अब्बासी शहरातील प्रसिद्ध डॉ. अब्बासी यांच्या कुटूंबातील सदस्य आहे. तो त्यांच्यासोबतच राहतो. एटीएस त्याच्या कुटूंबातील अन्य सदस्यांचीही चौकशी करत आहे.
एटीएसचा तपास सुरू
एसएसपी डॉ. विपीन टाडा यांनी रविवारी रात्री उशिरा एटीएसने तपास हाती घेतल्याचे स्पष्ट केले. एटीएस व पोलिसांचे एक पथक हल्लेखोर अहमद मुर्तझा अब्बासी यांच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याचे वडील व कुटूंबातील अन्य सदस्यांची चौकशी केली. एटीएस मुर्तझाचे परदेशी कनेक्शनही खंगाळून काढत आहे.
सकाळीच मुंबईहून आला होताअहमद मुर्तझा रविवारी सायंकाळी 7 वा. गोरखनाथ मंदिराच्या गेटवर पोहोचला होता. पीएसी जवान गोविंद गौडव व अनिल पासवान यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. जवानांनी त्याला रोखले असता त्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी अनिल आपला सहकारी गोविंदच्या बचावासाठी धावला असता अब्बासीने त्याच्या हात व पोटावर हल्ला केला. या दोघांवर हल्ला होताना पाहून गेटच्या आत तैनात शिपाई अनुराग राजपूत रायफल घेऊन आरोपीच्या दिशेने धावले. त्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सूत्रांच्या माहितीनुार, हल्लेखोर रविवारी सकाळीच मुंबईहून गोरखपूरला आला होता. त्याच्याकडून धारदार चाकू व लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.
योगी, गोरखनाथ मंदिर हल्लेखोरांच्या रडारवर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.