आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये मंगळवारी पोलिसांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या दारु माफियांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला एनकाउंटरमध्ये ठाक केले. कासगंजमध्ये मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता SI अशोक आणि शिपाई देवेंद्र नगला धीमर गावात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेले होते. दोघे तिथे पोहोचताच गुंडांनी लाठ्या-दांडुक्यांनी त्यांच्यावर हल्ला केली. या हल्ल्या देवेंद्र यांचा मृत्यू झाला.
SI अशोक देखील गंभीररित्या जखमी झाले. अवैध दारु व्यवसायासाठई नगला धीमर गाव प्रसिद्ध आहे. येथे बऱ्याचदा पोलिसांची कारवाई होत असते.
एलकारला ठार केले, आता मोती धीमरचा शोध सुरू
कासगंज प्रकरणी ठार झालेला आरोपी एलकार आहे. तो मुख्य आरोपी मोती धीमरचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. मोती धीमर अद्यापही फरार आहे. नगला धीमरमध्ये काळ्या नदी किनारे एलकारचा एनकाउंटर करण्यात आला. बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
आरोपींनी गावात पोलिसांवर हल्ला केल्यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी नेले होते
पोलिसांनुसार, मोती धीमर आणि त्याच्या साथिदारांनी पोलिसांना आधी गावात मारहाण केली, त्यानंतर त्यांना बंदी बनवून अज्ञात ठिकाणी नेले होते. सूचना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहिमेदरम्यान SI एका शेतात अर्धनग्न आणि जखमी अवस्थेत सापडले होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लावण्याचे निर्देश दिले होते. योगी यांनी शहीद शिपाई देवेंद्रच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.