आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठोर कारवाई:काश्मिरात दहशतवादावर प्रहार; 200 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

हारुण रशीद | श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचा आर्थिक कणा मोडण्यासाठी राज्य तपास संस्थेची (एसआयए) कारवाई सुरू आहे. प्रतिबंधित संघटना जमात-ए-इस्लामीच खोऱ्यात फुटीरतावाद्यांना आर्थिक मदत करत आहे. एसआयएद्वारे रविवारी जमात-ए-इस्लामच्या १०० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. एसआयए प्रवक्त्यानुसार, ही कारवाई गांदबल, बांदीपोरा, कुपवाड आणि बारामुल्ला जिल्ह्यांत झाली. आतापर्यंत २०० कोटी रु. संपत्ती गोठवली आहे.

एसआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा संस्थांनी सुमारे १८८ मालमत्तांची ओळख पटवली आहे. त्याचे बाजार मूल्य १००० कोटी रु. आहे३ तज्ज्ञांनुसार, सर्व संपत्ती सील केल्या जातील आणि बँक खात्यांच्या सत्यापनानंतर गोठवल्या जातील. काश्मीरमध्ये वेगवान कारवाई होत आहे. हा निश्चितच फुटीरतावाद्यांसाठी सर्वात मोठा झटका असेल. विशेष म्हणजे, जमातने ३० वर्षांत विशाल साम्राज्य उभे केले. त्यात जमीन, शॉपिंग मॉल, शाळेसह मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.

खोऱ्यात जमातच्या ३०० शाळांवरही बंदी
सरकारने निर्बंध घातलेल्या जमात-ए-इस्लामीकडून एकट्या काश्मीरमध्ये ३०० हून जास्त शाळा चालवल्या जात होत्या. आता त्यांच्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आहे की, येथ्ील विद्यार्थी दहशतवाद किंवा फुटीरतावादात ढकलले जाऊ नयेत.

‘लष्कर’चा अतिरेकी पोलिसांच्या ताब्यात
जम्मू-काश्मीर पोलिस आणि सैन्याच्या संयुक्त मोहिमेत लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी मोहंमद इशाक लोनला अटक केली आहे. त्याच्याकडमन एक पिस्तुल, मॅग्झीन, पिस्तुलच्या १८ फैरीसह अन्य शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.

दहशतवादी घटनांमध्ये १६८% घट : ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर च्या दाव्यानुसार, सर्जिकल स्ट्राइकसह सरकारने उचललेल्या पावलांमुळे २०१४ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांत १६८% घट आली आहे. ईशान्य राज्यात कट्टरपंथीयांच्या घटनांत ८०% घट झाल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची संपत्तीही जप्त
काश्मीरच्या डोडात अधिकाऱ्यांनी लष्कर-ए-तोयबाचा फरार कमांडर अब्दुल राशिद उर्फ जहांगीरची संपत्ती जप्त केली. अब्दुल सध्या सीमारेषेपलीकडून काम करत आहे आणि दहशतवादी नेटवर्क उभे करत आहे. त्याची डोडा जिल्ह्यातील थाथरीच्या खानपुरा गावात चार कॅनॉलपेक्षा जास्त जमीन आहे. दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर यावर कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षक अब्दुल कयूम म्हणाले, पाकिस्तानातून काम करणाऱ्या सर्व लोकांवर कारवाई केली जाईल. हे लोक सोशल मीडियाद्वारे तरुणांना चिथावण्याचे काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...