आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलालाबाद:अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या वाहनावर हल्ला, गाेळीबाराचाही दावा

जलालाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या छायाचित्रात जखमी झालेला अकाली दलाचा कार्यकर्ता. दुसऱ्या छायाचित्रात बादल यांची कार दिसत आहे. - Divya Marathi
पहिल्या छायाचित्रात जखमी झालेला अकाली दलाचा कार्यकर्ता. दुसऱ्या छायाचित्रात बादल यांची कार दिसत आहे.
  • काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांत उडाली चकमक

पंजाबमध्ये तरणतारण जिल्ह्यातील भिखिविंडमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांत मंगळवारी चकमक उडाली. दोन्ही बाजूंदरम्यान गोळीबारही झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांचे वाहन काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोडले, काँग्रेसच्या गुंडांनी बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, असा आरोप अकाली दलाने केला आहे. अकाली दलाचे तीन समर्थक गोळी लागल्याने जखमी झाले, असे म्हटले जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना जलालाबाद येथील आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या उमेदवारांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर दोन्ही गटांत जोरदार चकमक उडाली. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. यादरम्यान लाठीहल्ला तसेच गोळीबारही झाला. या घटनेनंतर शिरोमणी अकाली दलाने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना साथ दिली, असा आरोप पक्षाचे प्रवक्ते दलजितसिंह चिमा यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...