आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगाल ममतांसोबत:​​​​​​​ममतांवरील हल्ले बंगाली अस्मितेशी जोडले गेल्यामुळे भाजपला फटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप २०१६ च्या तीन जागांवरून आता भलेही ७९ पर्यंत पोहोचला तरीही हे त्यांच्यासाठी निराशाजनक राहिले.

भाजप कार्यकर्ते नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवात भलेही आनंद शोधत असतील, मात्र बंगालने आपल्या मुलीच्या पक्षाला तिसऱ्यांदा सत्ता सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमची “२ मई दीदी गई’ ही इच्छा पूर्ण झाली नाही. त्यामुळे ममता पराभूत झाल्या, मात्र त्यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. कम्युनिस्ट-काँग्रेसचा सफाया करून भाजप विरोधी पक्षाच्या रूपात पुढे आला यादृष्टीने त्यांचे “असोल परिवर्तन’ अवश्य झाले. एकछत्री राज्याच्या तोऱ्यातील बंगालमधील हा बदल आहे. हा गळेकापू राजकारण, केंद्रीय व्यवस्थेच्या भीषण संघर्षाच्या रूपात खुलेआम होईल. तृणमूलच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ममतांविरुद्ध भाजपचा प्रत्येक फासा उलटा पडला. “अबकी बार २०० पार’ या घोषणेतून याची साक्ष पटते. घोषणा भाजपची, मात्र, तृणमूलच्या पारड्यात या जागा आल्या. भाजपच्या प्रत्येक हल्ल्याचा फायदा ममता यांना सहानुभूतीच्या रूपात मिळाला. लोकांनी त्यांची खिल्ली उडवलेली गांभीर्याने घेतली.

भाजप २०१६ च्या तीन जागांवरून आता भलेही ७९ पर्यंत पोहोचला तरीही हे त्यांच्यासाठी निराशाजनक राहिले. पक्ष २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बराच मागे राहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला २९४ पैकी १२१ विधानसभा जागांवर आघाडी मिळाली होती. यामुळे उत्साहित भाजप नेतृत्वाने बंगालमध्ये पूर्ण ताकद लावली होती. असे असतानाही पक्ष आपल्या दाव्याच्या जवळपासही पोहोचू शकला नाही. भाजपने वर्षभरात मोठ्या संख्येने तृणमूल आणि डाव्या आघाडीच्या नेत्यांना फोडले आणि १४२ हून जास्त दलबदलूंना तिकीट दिले. काँग्रेस व डाव्यांची मतपेढी लोकसभेप्रमाणे भाजपकडे पूर्ण वळली नाही.

ध्रुवीकरण यशस्वी होऊ शकले नाही
ममतांच्या कथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धर्तीवर भाजपच्या हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. हा भाजपचा प्रयत्न तृणमूलसाठी फायदेशीर राहिला. ममता आपल्यातील “मीरजाफर’ची(धोकेबाज) ओळख करून देण्यात यशस्वी राहिल्या. असदुद्दीन ओवेसी आणि कम्युनिस्ट-काँग्रेस-इंडियन सेक्युलर फ्रंटचे भाग्य समोर आले. ममतांनी “चंडी पाठ’ करून भाजपच्या “जय श्रीराम’ला बाजूला सारले. ममतांचा बाहेरचा आणि आपला मुद्दा फलद्रूप ठरला. बिहार, यूपी आणि गुजरातची पूर्ण फौज व सामग्रीसमोर एकटी पुरून उरले, असे त्या म्हणत राहिला. निवडणुकीच्या दिवशी कूचबिहार गोळीबाराची घटना त्यांनी आपल्या पक्षाच्या बाजूने कॅश केली.