आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एक झाड वर्षभरात सुमारे ११८ किलोग्रॅम ऑक्सिजन देते. या प्राणवायूची बाजारातील किंमत सुमारे ४५ हजार रुपयांहून जास्त असू शकते. त्याशिवाय वर्षभरात सुमारे २० हजार रुपयांचे खत, ९,५०० रुपयांचे लाकूडही देते. हे सर्व आकडे एकत्र केल्यास एक झाड वर्षभरात नफ्याची सुमारे ७४,५०० रुपये एवढी रक्कम देऊ शकते.
हे आकडे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचे आहेत. त्यांच्या हिशेबानुसार २ हजार ९४० झाडे तोडल्यास वार्षिक सुमारे ३४७ टन ऑक्सिजनचे संरक्षण होऊ शकते. सोबतच २१.९० कोटी रुपयांचा नफाही होईल. या गणितात झाडांची मोजदाद २ हजार ९४० अशी करण्यात आली. कारण ही कत्तल केली जाणारी झाडे आहेत. त्याची तयारी सुरू आहे. मथुरा-गोवर्धन मार्गावरील २५.७४ किलोमीटरचा भागात चाैपदरी रस्ता बांधला जाणार आहे. वर्क ऑर्डर निघाली आहे. परंतु हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने झाडे तोडण्याच्या आधी त्याच्या अभावी संभाव्य हानीचा आढावा घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे तूर्त वृक्षतोड झालेली नाही म्हणून आधी दिलासा मिळाला आहे. दैनिक भास्करच्या प्रतिनिधीने संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथे तोडण्यासाठी काही झाडांना चिन्हांकित करण्यात आल्याचे दिसले.
हे वृक्ष ८० ते १२५ वयोमानाचे आहेत. त्याच्या परिसरात राहणारे लोकही पिढ्यानपिढ्यांपासून तेथे वास्तव्याला आहेत. गोवर्धनपासून पाच किलोमीटर पुढे एक १२५ वयोमानाचा निंब आहे. त्याच्या सावलीत बसलेले ७५ वर्षीय रामसिंह म्हणाले, आम्ही हे झाड लहानपणापासून पाहतोय. त्यांच्या शेजारी बसलेल्या ७० वर्षीय शिशुपालांनीही आठवण सांगितली. आम्ही लहान होतो. आमचे आजी-आजोबा त्याचे वय तेव्हा वय ६०-६५ सांगायचे. त्याला तोडण्याचे एेकल्यावर ते दोघेही भावुक झाले.
१ महिना, ४ कुटुंबांना प्राणवायू
पर्यावरणतज्ज्ञ आरती खोसला म्हणाल्या, एका वयस्कर व्यक्तीला दररोज सुमारे ६२८ किलोग्रॅम (सुमारे ५५० लिटर) प्राणवायू लागतो. ‘डिस्कव्हरी हेल्थ’ चाही हा अंदाज आहे. त्यानुसार अशा महाकाय झाडांचे संवर्धन झाल्यास आॅक्सिजन (सुमारे ३४७ टन ) वाचवता येऊ शकते. त्यावर चार सदस्यांच्या चार कुटुंबांचे (१६-१८ लोक) भरण होऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.