आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फरीदाबादमध्ये विद्यार्थिनीची हत्या:अगोदर अपहरण केल्यानंतरही आरोपीला माफ करणे विद्यार्थिनीला पडले महागात; दाेन आराेपी अटकेत, लव्ह जिहादचा आराेप

फरिदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेवातमध्ये पाच तास शोध घेतल्यानंतर मुख्य आरोपीला ताब्यात घेतले

हरियाणाच्या बल्लभगडमध्ये साेमवारी निकिता नावाच्या विद्यार्थिनीची गाेळी मारून हत्या करण्यात आली. निकिता परीक्षेसाठी जात हाेती. रस्त्यात ताैसिफ व रेहान यांनी तिला अडवले. तिचा अपहरणाचा प्रयत्न केला. परंतु त्यात अयशस्वी झाल्याने ताैसिफने तिला गाेळी मारली. त्यात निकिताचा मृत्यू झाला. याप्रकरणात दाेन्ही आराेपींना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पाेलिस अधीक्षक जयपीर राठी म्हणाले, बी. काॅमच्या अंतिम वर्षात शिकणारी निकिता आराेपी ताैसिफला आेळखत हाेती. परीक्षा देण्यासाठी त्याने निकिताला बळजबरीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने नकार दिला. या वादातच आराेपीने विद्यार्थिनीला गाेळी मारली. विद्यार्थिनी तेथेच काेसळली आणि तिचा मृत्यू झाला. दाेघेही घटनास्थळाहून फरार झाले. परंतु नंतर दाेघांनाही अटक झाली. मुख्यमंत्री मनाेहरलाल खट्टर म्हणाले, दाेषींच्या विराेधात कडक करण्यात येणार आहे.

पाेलिस अधिकारी अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. लवकरच तपास व कालबद्ध सुनावणी केली जाणार आहे. दुसरीकडे नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार आराेपी २ आॅगस्ट २०१८ राेजी तरुणीचे अपहरण करण्यात आले हाेते. या संबंधीची तक्रार दाखल करण्यात आली हाेती.

मात्र नंतर तडजाेड करण्यात आली. मात्र नाराज नातेवाइकांनी मंगळवारी दुपारी बल्लभगडमध्ये दिल्ली-मथुरा महामार्गावर रास्ता-राेकाे केला. मुलीचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा त्यांचा प्रयत्न हाेता. मात्र या प्रयत्नात ते अयशस्वी ठरल्याने त्यांनी निकिताची हत्या केल्याचा नातेवाइकांचा आराेप आहे. विद्यार्थिनीचे नातेवाईक हाकिम सिंह म्हणाले, आराेपी मुलीवर वारंवार दबाव टाकत हाेता.