आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगरतळा:त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा प्रयत्न; तीन तरुणांना अटक

आगरतळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. देव गुरूवारी सायंकाळी घरापासून जवळ चालत जात होते. त्याचवेळी त्यांचे सुरक्षा कडे भेदून कार निघून गेली. देव यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेत स्वत: चा बचाव केला. त्यात एक सुरक्षा रक्षक राजीव अधिकारी जखमी झाले.

घटनेनंतर सुरक्षा दलास या आरोपींना लगेच पकडण्यात यश आले नव्हते. कारमध्ये तीन तरूण होते. पोलिसांनी रात्री शुभम साहा (२७), अमन साहा (२५), गैरिक घोष (२४) यांना अटक करून त्यांची कार जप्त केली. शुभम साहाचे वडील प्रंतोष साहा यांच्या नावावर ही कार आहे. तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा कोर्टाने त्यांची १४ दिवसांसाठी तुरुंगात रवानगी केली. तरूणांचा अशा प्रकारे वाहन चालवण्याचा उद्देश काय होता, याची चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...