आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Attempted Infiltration In Kashmir's Machil, Three Army Martyrs Including Army Captain, Three Terrorists Also Killed

काश्मिरात पाकिस्तान सीमेवर एन्काउंटर:​​​​​​​माछिलमध्ये घुसखोरी रोखताना सैन्याच्या कॅप्टनसह 3 जवान शहीद, 3 दहशतवाद्यांचा खात्मा

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दहशतवाद्यांकडून जप्त केली एके-47 आणि दोन बॅग

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सीमेजवळ दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी सैन्याने ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. चकमकीमध्ये सैन्याच्या कॅप्टनसह 3 जवान शहीद झाले आहेत. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑपरेशन अजुनही सुरू आहे.

दहशतवाद्यांकडून जप्त केली एके-47 आणि दोन बॅग
संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले की, सैन्याने 7-8 नोव्हेंबरच्या रात्री सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. घटनास्थळावरुन एके-47 रायफल आणि दोन बॅग आढळले. यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...