आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्ली ते वाराणसी जाणाऱ्या स्पाईस जेट विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधील एका प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात अाले. तो व्यक्ती विमान हवेत असताना अचानक अातपकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. विमानातील इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी जोरात दरवाजा लावून घेतला. महत्वाचे म्हणजे ४० मिनिटे त्याला खाली बसवून ठेवण्यात अाले. विमान कंपनीच्या माहितीनुसार ही घटना २७ मार्चला घडली. स्पाईस जेट कंपनीच्या एसजी- २००३ या विमानात ८९ प्रवाशी होते.
दिल्ली ते वाराणसी प्रवासादरम्यान अचानक एका व्यक्तीने अापतकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर प्रवाशी अाणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. तर दुसरीकडे विमानाचे पायलट यांनी तात्काळ नियंत्रक अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन विमानाला लवकर उतरविण्याची परवानगी मागितली. वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री विमान तळावर उतरताच सदर व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात अाले. हा व्यक्ती गुरुग्राम येथील रहिवासी असून त्याचे नाव गाैरव खन्ना असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे समोर अाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.