आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Attempts To Impose Uniform Rules On Employees In Hoshiarpur; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:वेगवेगळी केशरचना करू नका, चांगले दिसत नाही, अंबाडा बांधा; महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आदेश

होशियारपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • होशियारपूरमध्ये कर्मचाऱ्यांवर गणवेश नियम लागू करण्याचे प्रयत्न

महिला पोलिस कर्मचाऱ्यांना आता वेगवेगळी केशरचना करून कामावर येता येणार नाही. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे एसएसपी पद स्वीकारणाऱ्या एसएसपी अमनीत कौंडल यांनी याबाबत लेखी आदेश सर्व पोलिस ठाण्यांचे प्रमुख व महिला पोलिस ठाण्यांना बजावले आहेत. या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, जी महिला कर्मचारी या आदेशांची अवहेलना करताना आढळेल तिच्याविरोधात विभागीय कारवाई केली जाईल. एसएसपींनी काढलेल्या पत्र क्रमांक- ५७४३८-७८ मध्ये म्हटले आहे की, जिल्हा युनिटच्या महिला दलाने गणवेश पॅटर्ननुसार घातलेला नसतो. एवढेच नव्हे तर गणवेशासोबत वेगवेगळ्या प्रकारची केशरचना केलेली असते, जे चांगले दिसत नाही. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना समज दिली जात आहे की, गणवेश पॅटर्ननुसारच घालावा.

महिला कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची केशरचना न करता साधा अंबाडा करावा आणि त्यावर जाळीही लावावी. या सर्व सूचनांचे पालन खात्रीशीरपणे केले जावे. या पत्रात असा इशाराही देण्यात आला आहे की, जर एखादी महिला कर्मचारी या सूचनांकडे दुर्लक्ष करत असेल तर तिच्याविरोधात विभागीय कारवाईही केली जाईल. आता कर्मचारी गणवेश पॅटर्ननुसार येतात की नाही हे बघावे लागेल. मात्र एसएसपी कौंडल यांच्या आदेशांची अवहेलना झाल्यास कारवाई होण्याची शक्यता नक्कीच आहे. म्हणून आगामी काळात गणवेशाबाबत निष्काळजीपणा करणारे कर्मचारी या आदेशाचे पालन जबाबदारीने करतील ही आशा आहे.

महिला-पुरुष सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे गणवेश पॅटर्न
सर्वत्र दिसून येते की, ज्या महिला-पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस ठाण्यात किंवा डीएसपी, एसपींशी संबंधित कार्यालयात ड्यूटी असते तेथे कर्मचारी गणवेश पॅटर्न पाळत नाहीत. फील्ड जॉब नसल्याने कार्यालयात कर्मचाऱ्यांवर गणवेश पॅटर्नमध्ये राहण्याचा दबावही नसतो. अधिकारीही नेहमीच ते गंभीरपणे घेत नाहीत. मात्र, एसएसपी अमनीत कौंडल यांनी हे लक्षात घेऊन नवे आदेश काढले आहेत. एसपी रविंदरपालसिंग संधू यांनी सांगितले, पंजाब पोलिसांचा ड्यूटीच्या वेळी जो गणवेश पॅटर्न आहे तो सर्वांवर लागू आहे. मग तो पुरुष कर्मचारी असो की महिला कर्मचारी. गणवेश पॅटर्नमध्ये राहणे शिस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...