आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना:मध्य प्रदेशातील ९ मृतांवर अंत्यसंस्कार; कुटुंबातील महिला दु:खावेगाने बेशुद्ध, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू

शहडोल / उमरियाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृतांवर उमरिया येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व १६ मजुरांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी मध्य प्रदेशातील त्यांच्या गावी पोहोचले. उमरियाजवळील ममान व शहडोलजवळील अंतवळी गावात हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते. मृतदेह गावात पोहोचताच एकच आकांत उसळला. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. शेकडो लोकांची गर्दी उसळली असूनही सर्वत्र भयाण शांतता पसरलेली दिसून आली. कुटुंबातील महिला दु:खावेगाने बेशुद्ध पडत होत्या. त्यांना आवरत सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमरियाच्या चिल्हारी व ममान गावात ५ चिता पेटवण्यात आल्या. शहडोल जिल्ह्यातील अंतवळी गावात एकाच वेळी ९ जणांचा अंत्यसंस्कार पार पडला. या वेळी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी हजर हाेते.

विशेष रेल्वेने आले मृतदेह

दुपारी औरंगाबादहून विशेेष रेल्वेने आलेले १६ जणांचे मृतदेह उमरिया व शहडोलमध्ये ताब्यात घेण्यात आले. उमरियामध्ये दुपारी २.१५ वाजता रेल्वे पोहोचली. जिल्हाधिकारी स्वरोचिष साेमवंशी, एसपी सचिन शर्मा व रेल्वे पोलिस चौकीचे प्रभारी डी. के. सिंह यांच्यासह सर्व अधिकारी हजर होतेे. रुग्णवाहिकेने मृतदेह त्यांच्या गावी नेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...