आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aurangabad's Deepali Realized America's Dream Of Playing In The World Cup With The Help Of 15 Indian Women Cricketers

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादच्या दीपाली यांनी 15 भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मदतीने साकारले विश्वचषकामध्ये खेळण्याचे अमेरिकेेचे स्वप्न

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण मिळवणारा, बास्केटबॉल व बेसबॉलचा बादशहा अमेरिका आता क्रिकेटच्या विश्वातही अस्तित्व निर्माण करत आहे. याची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांवर असेल. औरंगाबादच्या दीपाली रोकडे यांच्या प्रशिक्षणाखाली अमेरिकेचा १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. या संघातील सर्व १५ खेळाडू भारतीय आहेत. त्यापैकी अनेकींनी कुटुंबीयांकडून क्रिकेटचे धडे व स्थानिक क्लबमध्ये प्रशिक्षण घेतले.

१४ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान प्रथमच आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० वर्ल्डकपचे आयोजन केले जात आहे. यात अमेरिकेचा क्रिकेट संघ भाग घेणार आहे. गीतिका कोदाली कर्णधार असून अनिका कोलन उपकर्णधार आहे. यष्टीरक्षक पूजा गणेशसह अदिती चुडासमा, भूमिका बद्रीराजू, दिशा ढींगरा, इशानी वाघेला आदी १५ खेळाडूंशिवाय ५ राखीव खेळाडूंचीही घोषणा केली. या पाच जणीही भारतीय आहेत. तथापि, टीम अॅनालिस्ट रोहन गोसला आणि टीम सिलेक्शन पॅनेलही भारतीयांचेच आहे. त्याचे अध्यक्ष रितेश काडू आहेत. ज्योत्सना पटेल व दीपाली रोकडे पॅनेलच्या सदस्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये अमेरिकेचा हा पहिला अांतरराष्ट्रीय सामना असेल. यापूर्वी २०१० मध्ये पुरुषांच्या अंडर-१९ महिला क्रिकेट संघाने टी-२० स्पर्धा खेळली होती. संघाचा प्रशिक्षक चंद्रपॉल सांगतो, आम्ही अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत प्रथमच आयोजित होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये भाग घेत आहोत. आमच्या संघाने एक वर्ष खूप मेहनत घेतली. आम्ही नवखे असलो तरी चांगली कामगिरी करू. या वर्ल्डकपमध्ये १६ संघ ४ गटांत खेळतील.

बातम्या आणखी आहेत...