आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aurangzeb's Entry In Maa Shringar Gauri Case, The Masjid Committee In Varanasi Said – Gyanvapi Shahi Masjid Is Alamgir; Hindu Side Said If The Property Belongs To Waqf Then Show The Deed

माँ शृंगार गौरी खटल्यात औरंगजेबाचा प्रवेश:ज्ञानवापीचे वर्णन शाही मस्जिद आलमगीर; मालमत्तेचे डीड दाखवण्याची हिंदूंची मागणी

वाराणसी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीच्या ज्ञानवापी-मां शृंगार गौरी खटल्याची सुनावणी आता मुघल सम्राट औरंगजेबाभोवती केंद्रित झाली आहे. अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीचे म्हणणे आहे की, 1669 मध्ये बादशाह औरंगजेब सत्तेवर होता. त्यामुळे त्याकाळी जी काही संपत्ती होती ती बादशाह औरंगजेबाची होती. सम्राट औरंगजेबाने जेव्हा ज्ञानवापीची संपत्ती दान केली तेव्हा तिथे मशीद बांधली गेली.

त्याचबरोबर ज्ञानवापींच्या मालमत्तेला वक्फची मालमत्ता म्हणणे ही मोठी फसवणूक असल्याचे याचिका दाखल करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे. जर औरंगजेबाने ज्ञानवापी मशिदीची मालमत्ता दान केली होती तर ती कागदपत्रे न्यायालयात सादर केली जावीत अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.

सध्या वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात हिंदू बाजूच्या युक्तिवादावर मुस्लिम बाजूचा प्रतिवाद बुधवारी पूर्ण होणार आहे. यानंतर, मुस्लिम बाजूच्या प्रतिवादावर हिंदू बाजू आपले प्रतिउत्तर दाखल करेल.

स्वामी जितेंद्रनंद म्हणाले - त्यांच्या वडिलांनी स्वर्गातून जमीन आणली होती का?

अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने ज्ञानवापीची जमीन मुघल शासक औरंगजेबाची असल्याचे वर्णन केले आहे. यावर अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वामी जितेंद्रनंद म्हणाले, "त्यांच्या बापाने जणू स्वर्गातून जमीन आणली होती. जर त्यांनी शासकाची आणि सत्ता ज्याच्याकडे असते त्याची जमीन असा युक्तिवाद केला तर आम्ही सध्याच्या सरकारवर दबाव आणू शकतो. मग मंदिरे पाडून जी 3000 मशिदी बांधण्यात आल्या त्याला सरकारने ताब्यात घेतले पाहिजे. मुसलमान जो युक्तिवाद करत आहेत त्याप्रमाणे हेच योग्य राहील. म्हणून मुस्लिमांनी असे गैरकृत्य टाळले तर बरे होईल.नाहीतर त्याचे परिणाम त्यांना दीर्घकाळ भोगावे लागतील."

आधी जाणून घेऊया मसाजिद कमिटीच्या वकिलांनी आतापर्यंत काय म्हटलंय...

ज्ञानवापी-माँ शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी आजही जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू राहणार आहे.
ज्ञानवापी-माँ शृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी आजही जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू राहणार आहे.

मस्जिद समितीने ज्ञानवापीला शाही मस्जिद आलमगीर असे संबोधले

22 ऑगस्टपासून मसाजिद समितीचा युक्तिवाद सुरू आहे. यामध्ये वकील शमीम अहमद, रईस अहमद, मिराजुद्दीन सिद्दीकी, मुमताज अहमद आणि एजाज अहमद यांनी वक्फ बोर्डाची स्थापना 1936 मध्ये झाल्याचे सांगितले. 1944 च्या गजट मध्ये ज्ञानवापी मशिदीचे नाव शाही मशीद आलमगीर असल्याचे समोर आले होते.

ही मालमत्ता सम्राट आलमगीर म्हणजेच सम्राट औरंगजेब यांची असल्याचे सांगण्यात आले. वक्फ कलाकार म्हणून बादशाह आलमगीरच्या नावाची नोंदही होती. अशाप्रकारे, 1669 मध्ये सम्राट औरंगजेबने 1400 वर्ष जुन्या शरई कायद्यानुसार दान केलेल्या मालमत्तेवर मशीद बांधली गेली आणि तेव्हापासून आजपर्यंत तेथे नमाज अदा केली जात आहे.

याशिवाय 1883-84 मध्ये ब्रिटीश राजवटीत जेव्हा बंदोबस्त लागू करण्यात आला तेव्हा सर्वेक्षण करून अराजी क्रमांक करण्यात आला. त्यावेळी अराजी क्रमांक 9130 मध्ये मशीद, कबर, कब्रस्तान, समाधी आणि विहीर असल्याचे दाखवण्यात आले होते. ज्ञानवापी मशीद ही वक्फची मालमत्ता असल्याचेही यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये ठरविण्यात आले आहे.

त्यामुळे माँ शृंगार गौरीचे प्रकरण दिवाणी न्यायालयात चालवणे योग्य नाही. सरकारही याला वक्फ मालमत्ता मानते, म्हणूनच काशी विश्वनाथ कायद्यात मशीद विचारात घेण्यात आली नाही. 2021 मध्ये, मशीद आणि मंदिर व्यवस्थापनामध्ये जमिनीची देवाणघेवाण देखील वक्फ मालमत्ता असल्याचे गृहीत धरून झाली. ही मालमत्ता मुस्लिमांची होती, आहे आणि राहील.

आज मसाजिद कमिटीचा प्रतिवाद पूर्ण होईल, त्यानंतर वादिनी महिलांचे वकील उत्तर दाखल करतील. 2021 मध्ये या महिलांनी गुन्हा दाखल केला होता.
आज मसाजिद कमिटीचा प्रतिवाद पूर्ण होईल, त्यानंतर वादिनी महिलांचे वकील उत्तर दाखल करतील. 2021 मध्ये या महिलांनी गुन्हा दाखल केला होता.

चला तर मग जाणून घेऊया फिर्यादी महिलांच्या वकिलांचे काय म्हणणे आहे...

मुस्लिम पक्षाने ज्ञानवापीपासून 2 किमी अंतरावर असलेल्या आलमगीर मशिदीचे कागदपत्र सादर केले आहेत

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन सांगतात की, प्रतिसादात मुस्लीम पक्ष स्वतःच्याच युक्तिवादात अडकलं आहे. त्यांनी न्यायालयात कागदपत्रे सादर करून ज्ञानवापीची मालमत्ता वक्फ क्रमांक 100 म्हणून नोंदवली आहे, ही मोठी फसवणूक असून ज्ञानवापीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आलमगीर मशिदीची कागदपत्रे त्यांनी सादर केली आहेत.

ती मशीद बिंदू माधव मंदिर पाडून बांधली गेली. ज्ञानवापी मशिदीचे नाव आलमगीर मशीद नसल्याचे सर्वांना माहीत आहे. आता त्यांच्याकडून ज्ञानवापी मशिदीला आलमगीर मशीद असे सांगण्यात येत आहे. ज्ञानवापी मशिदीच्या मालमत्तेचा वक्फ औरंगजेबाने केला असेल तर ती कागपत्रे सादर करायला हवी, पण मस्जिद कमिटी ती दाखवू शकली नाही.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरही ज्ञानवापी मशीद ही वक्फची मालमत्ता असल्याचा कुठेही उल्लेख नाही. मुस्लीम पक्षाची बाजू अयोग्य असून त्यांचा प्रतिवाद संपल्यानंतर आम्ही प्रत्युउत्तर दाखल केल्यास सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

बातम्या आणखी आहेत...