आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Auspicious Sign Of Recovery For The Country's Economy, GST Revenue At Rs 1 Lakh Crore For The First Time In 8 Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद:देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारीचे शुभ संकेत, 8 महिन्यांत प्रथमच जीएसटीचे उत्पन्न 1 लाख कोटी रुपयांवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनपूर्वीएवढीच डिझेलच्या खपाची स्थिती, ऑटोमोबाइल कंपन्यांच्या विक्रीत 18% झाली वाढ

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी शुभ संकेत आहेत. ८ महिन्यांत प्रथमच जीएसटी उत्पन्न ऑक्टोबरमध्ये १.०५ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. जीएसटीचे उत्पन्न १ लाख कोटींवर जाण्याची या आर्थिक वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नव्हे तर गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत हा आकडा १०% जास्त आहे. दुसरीकडे ऑक्टोबरने कार कंपन्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सर्व कंपन्यांनी देशांतर्गत बाजारात ऑक्टोबरमध्ये एकूण विक्रीत १८% वाढ मिळवली आहे. या वर्षी कंपन्यांनी ३,३३,७५९ कारची विक्री केली, गेल्या वर्षी याच अवधीत २,८४,०४८ कारची विक्री झाली होती. पेट्रोलनंतर आता ऑक्टोबरमध्ये डिझेलची मागणीही कोरोना महामारीच्या आधीच्या स्तरावर आली आहे. डिझेलची मागणी ऑक्टोबरमध्ये वर्षभराच्या तुलनेत ६.६% जास्त राहिली. ‘फिक्की’च्या अध्यक्षा संगीता रेड्डी म्हणाल्या की, कोरोनाला तोंड देण्यासाठीची भारताची व्यूहरचना योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. अर्थव्यवस्थाही आता लवकरच रुळावर येईल.

ऑटाे सेक्टर : टाटाने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ७९.२०% आणि मारुतीने १७.६% जास्त कार विकल्या

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबरमध्ये मारुतीची एकूण कारची विक्री १७.६% व ह्युंदाईची १३.२% नी वाढली आहे. टाटा मोटर्सने कारच्या विक्रीत सर्वाधिक ७९.२०% वाढ मिळवली आहे.

८ महिन्यांनंतर प्रथमच डिझेलचा खप ६.६% वाढला

पेट्रोलनंतर आता ऑक्टोबरमध्ये डिझेलची मागणीही लॉकडाऊनच्या आधीच्या स्तरावर आली आहे. डिझेलची विक्री दर वर्षाच्या आधारावर ऑक्टोबरमध्ये ६.६% जास्त राहिली. डिझेलची विक्री ऑक्टोबरमध्ये ५७.९ लाख टनांवरून वाढून ६१.७ लाख टनांवर पोहोचली. पेट्रोलची विक्री सप्टेंबरमध्येच कोविड महामारीच्या आधीच्या स्तरावर आली होती.