आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Avalanche In Lugnak La Area, 18 Army Personnel Hit, Lieutenant Colonel And A Soldier Martyr

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिक्किम:लुगनक भागात हिमस्खलनात लेफ्टनंट कर्नल आणि एक जवान शहीद; 16 जवानांना वाचवण्यात बचाव पथकाला यश

गंगटोकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जवान उत्तर सिक्कीममध्ये 16 हजार 700 फूट उंचीवर गस्त घालण्यासाठी गेले होते

सिक्कीमच्या उत्तर भागात गुरुवारी झालेल्या हिमस्खलनात कर्नल आणि एक जवान शहीद झाले. जवान गस्त घालत असताना ही घटना घडली. एकूण 18 जवान बर्फाखाली दबले होते. बचाव पथकाने 16 जणांना सुरक्षित बाहेर काढले. एसएस राव या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लेफ्टनंट कर्नल रॉबर्ट टीए बर्फाखाली दबल्यामुळे सापडत नव्हते. नंतर बचाव पथकाला त्यांचा मृतदेह सापडला. 

लष्कारातील सुत्रांनी सांगितले की, आमची टीम लुगनक भागात गस्त घालण्यासह बर्फ हटवण्याचे काम करत होती. त्यावेळी 16 हजार 700 फूट उंचीवर हिमस्खलन झाले आणि सैनिक त्याखाली दबले. गेल्या एका आठवड्यात उत्तर सिक्कीममध्ये हिमस्खलनाची ही तिसरी घटना आहे.

काश्मीरमध्येही हिमस्खलनाच्या घटना

यावर्षी जानेवारी जम्मू-काश्मिरच्या गांदेरबल भागात हिमस्खलन झाले होते. यामुळे यामुळे श्रीनगर-कारगिल रोडवरील गगनगीर परिसर बंद झाला होता. स्थानिक लोक आणि अधिकाऱ्यांनी शोध आणि बचाव मोहीम राबविली होती. यावेळी 4 नागरिकांना वाचवण्यात आले. काश्मीरमध्ये हिवाळ्यात काळात हिमस्खलन होत असतात.

बातम्या आणखी आहेत...