आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमस्खलन:सिक्कीमच्या  नाथू लामध्ये हिमस्खलन , 350 पर्यटकांना वाचवले, 7 मृत्युमुखी

गंगटोक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बचाव कार्य.  - Divya Marathi
बचाव कार्य. 

सिक्कीमच्या नाथू लामध्ये मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण हिमस्खलन झाले. यात ७ पर्यटकांचा मृत्यू झाला. बर्फात ८० वाहनांत अडकलेल्या ३५० पर्यटकांना सुखरुप गंगटोकला आणण्यात आले. ५-६ वाहनांत सुमारे ३० पर्यटक बर्फाखाली दबले आहेत. बचाव कार्य सुरू आहे.

हिमस्खलन गंगटोकच्या नाथू लास जोडणाऱ्या नेहरू मार्गावर १५ मैल अंतरावर झाले. नाथू ला चीन सीमेवर आहे. चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम भुटिया म्हणाले, परवानगी केवळ १३ मैलपर्यंत होती. पण पर्यटक १५ मैलपर्यंत जातात. हिमस्खलन तेथे झाले.

रस्त्यावर बर्फ साचल्याने अनेक पर्यटक खाईत कोसळले, ते दोरीच्या साह्याने चढाई करताना दिसतात.