आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला अवतार-2:अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचे रेकॉर्ड तोडणार; भारतात सर्वाधिक कमाई करणारा ठरेल चित्रपट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवतार-2 या हॉलिवूड चित्रपट भारतात रिलीजच्या 15 व्या दिवशी 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाची एकूण कमाई 316.75 कोटींवर गेली आहे. यासह, आता हा चित्रपट अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आला आहे.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमने भारतात 373.22 कोटींची कमाई केली. या आठवड्यात हा चित्रपट अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचा विक्रम मोडेल आणि भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अवतार-2 ने या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

एव्हेंजर्स एंडगेमच्या विक्रमापासून काही अंतरावर

अवतार-2 हा भारतातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. यामुळे अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहे. जर अवतार-2 चे कलेक्शन असेच चालू राहिल्यास, येत्या काही दिवसात तो भारतात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूड चित्रपटाच्या अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमच्या एकूण 373.22 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकेल. द जंगल बुक आणि द लायन किंग हे भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहेत.

हिंदी चित्रपटांनाही मागे टाकले

अवतार-2 ने केवळ हॉलिवूड चित्रपटच नाही तर 2022 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांनाही मागे टाकले आहे. ब्रह्मास्त्रने यावर्षी हिंदी चित्रपटांमध्ये 252 कोटींची कमाई केली होती. आता अवतार-2 ने कमाईच्या बाबतीत ब्रह्मास्त्रला मागे टाकले आहे.

हा चित्रपट 16 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता

अवतार-2 16 डिसेंबरला रिलीज झाला होता. देशातील निवडक शहरांमध्ये 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता चित्रपटाचा पहिला शो सुरू झाला होता. सुमारे दोन हजार कोटींमध्ये बनवलेल्या या चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स आणि बॅकग्राऊंड स्कोअरचे खूप कौतुक केले जात आहे. भारतात, इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सॅम वॉशिंग्टन, झो सलडाना, स्टीफन लँग, क्लिफ कर्टिस आणि केट विन्सलेट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अवतारच्या पहिल्या भागाने 19 हजार कोटींचे कलेक्शन

अवतार फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. याने रिलीजसोबतच बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड्स तोडले होते. सिनेमॅटिक इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने एकूण 19 हजार कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. चित्रपट प्रदर्शित होवून 13 वर्षे झाली आहेत. पण कमाईच्या बाबतीत चित्रपट आजही प्रथमस्थानावरच आहे.

बातम्या आणखी आहेत...