आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Average Monsoon Is Expected In The Country This Year, 96% Chance Of Rain In June September

मान्सूनचा अंदाज:यंदा देशामध्ये सरासरी मान्सूनची अपेक्षा, जून-सप्टेंबरात 96 टक्के पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान विभागाच्या महासंचालकांनी वर्तवला मान्सूनचा अंदाज

या वर्षी देशात मान्सून सरासरी राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण पावसाळ्यात ९६% पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. महापात्रा म्हणाले, दक्षिण-पश्चिम मान्सूनदरम्यान देशभरात जून ते सप्टेंबरपर्यंत ९६% पाऊस होऊ शकतो. यामध्ये ५% कमी किंवा अधिक असू शकतो. ते म्हणाले, १९७१-२०२० मधील आकडेवारी पाहता देशात दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस ८७ सेंटिमीटर आहे. तथापि, याच्या एक दिवस आधीच खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण मान्सूनवर अल नीनोचा धोका घोंघावत आहे. अल नीनोचा परिणाम होण्याची शक्यता : हवामान विभागानुसार, विषुववृत्तीय प्रशांत क्षेत्रात ला नीना तटस्थ आहे. ताज्या हवामान मॉडेल अंदाजानुसार अल नीनोची स्थिती पावसाळ्यादरम्यान विकसित होण्याची शक्यता आहे. अल नीनोचा प्रभाव मान्सूनच्या दुसऱ्या भागात जाणवू शकतो. महापात्रा म्हणाले, सर्व अल नीनो वर्षे खराब मान्सुनी वर्षे नसतात. १९५१-२०२२ दरम्यान ४० टक्के अल नीनो वर्षे सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक मान्सुनी पावसाचे राहिली आहेत.

गतवर्षी महाराष्ट्रात सरासरीच्या ११९ टक्के पाऊस गेल्या वर्षी राज्यात मान्सूनचे आगमन १० जून २०२२ रोजी झाले. २०२२ च्या मान्सून हंगामात सरासरीच्या ११९.८% पाऊस पडला. राज्यात सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये ७१.४%, जुलै-१४६.० %,ऑग􀃎स्ट- ९१.० %, सप्टें􀈂बर-१४१.६ % तर ऑक्टोबरमध्ये १९९.२ % पाऊस पडला. २०२१-२२ मध्ये सरासरीच्या ११८.२ % पाऊस पडला होता. (स्त्रोत- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल-२०२२-२३)