आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथायलंडमधून फेक जॉब ऑफर येत आहेत. परंतु अशा ऑफरकडे दुर्लक्ष करा. थायलंडमध्ये नोकरीचा विचारही करू नका, असा सल्ला केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. वास्तविक अशा प्रकारच्या ऑफर देण्याचे काम भारतात आणि दुबईत असलेले एजंट्स सोशल मीडियाद्वारे पाठवू लागले आहेत. अशा प्रकारच्या ऑफर आयटी फर्मकडून असल्याचा बनाव केला जात आहे. हे ठक कॉल सेंटर व क्रिप्टोकरन्सी फसवणुकीच्या प्रकरणांत सामील आहेत. या कंपन्या थायलंडमध्ये मार्केटिंग व सेल्सच्या प्रोफाइलचे जॉब देऊ करतात. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, तरुणांना खोट्या ऑफर देऊन सीमेपलीकडे म्यानमारला नेले जाते. तेथे मजुरी करण्यासाठी बंदी बनवले जाते. म्हणूनच भारतीयांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांची ऑफर टाळावी. २३ सप्टेंबरला परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडात वास्तव्याला असलेल्या भारतीयांच्या विरोधातील वाढत्या हेट क्राइमवरून अॅडव्हायझरी जाहीर केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.