आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अहमदाबादच्या आयशा आत्महत्या प्रकरणामध्ये गुजरात पोलिसांनी तिचा पती आरिफला राजस्थानच्या पालीमधून सोमवारी रात्री अटक केली होती. पोलिस मंगळवारी संध्याकाळी त्याला घेऊन अहमदाबादला पोहोचले, येथे लॉकअपमध्ये त्याची चौकशी करण्यात आली. अटकेपासून लॉकअपपर्यंतच्या आरिफच्या वागण्याने त्याला आयशाच्या आत्महत्येचा कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसले.
अहमदाबाद पोलिसांचे डीसीपी रवींद्र पटेल यांनी सांगितले की, चौकशी दरम्यान आरिफची वागणूक धक्कादायक होती कारण आयशाच्या मृत्यूचा त्याच्या चेहऱ्यावर थोडाही पाश्चाताप दिसला नाही. मी त्याला आयशाच्या गर्भपात बद्दलही प्रश्न विचारले, ज्यावर त्याने सहमती दर्शवली. म्हणजेच, गर्भपात झाल्यानंतर आयशाची प्रकृती गंभीर असूनही, आरिफ तिला भेटायलाही आला नव्हता, हे आयशाच्या कुटूंबाचे आरोप योग्य असल्याचे समजले आहे.
अटकेवेळी आरिफच्या चेहऱ्यावर काहीच दिसले नाही
आयशाने गेल्या शनिवारी साबरमती नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवून आरिफला पाठवला होता. आयशाच्या आत्महत्येनंतरचा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पती आरिफ घरातून फरार झाला. गुजरात पोलिस जालौरमध्ये त्याच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबातील लोकांनी सांगितले होते की, तो एका लग्नात गेला होता आणि तिथून कुठेतरी निघून गेला होता. यानंतर मोबाइल लोकेशनच्या आधारावर आरिफला सोमवारी रात्री पालीमध्ये अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरिफला पकडले तेव्हा तो पोलिसांसोबत चालू लागला जसे त्याने काहीच केलेले नाही. त्याच्या चेहऱ्यावर जराही फरक जाणवला नाही.
आरिफ 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत
पोलिसांनी आरिफला मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेटच्या कोर्टात हजर केले. पोलिसांनी 5 दिवसांची रिमांड मागितली होती, मात्र कोर्टाने 3 दिवसांची रिमांड मंजूर केली. त्याला 6 मार्चलला दुपारी 3 वाजेपर्यंत पोलिसांच्या कोठडीत पाठवले आहे.
वकिलांनी चकीत करणारे खुलासे केले होते
आयशाचे वकील जफर पठाण यांनी चकीत करणारे खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, 23 वर्षांच्या आयशाचे लग्न राजस्थानच्या जालौर येथे राहणाऱ्या आरिफसोबत 2018 मध्ये झाले होते. आरिफचे राजस्थानमधील एका मुलीसोबत अफेअर सुरू होते. आयशासमोरच आरिफ आपल्या गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ कॉलवर बोलायचा. तो आपल्या प्रेमिकेवर पैसे उडवायचा आणि याच कारणामुळे आयशाच्या वडिलांकडून पैशांची मागणी करायचा.
आरिफला शिक्षा मिळायला हवी
आयशाचे वडिल लियाकर अली म्हणाले की, त्यांना आरिफच्या वडिलांना फोन करुन संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कधीच माझा फोन उचलला नाही. माझी आयशा परत येणार नाही, मात्र तिच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे. जेणेकरुन कोणाच्याही मुलीसोबत असे होणार नाही. माझी मुलगी आयशा हसमुख होती, मात्र लग्नानंतर हुंड्यासाठी तिचे आयुष्य नरक बनले होते. एकदा तर सासरच्या लोकांनी तिला तीन दिवस जेवायला दिले नव्हते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.