आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ayesha Suicide Case : Husband Used To Talk To His Girlfriend In The Room, Endured For Three Years For The Family's Respect

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयशा आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा:पत्नीसमोरच पती गर्लफ्रेंडसोबत बोलायचा; आयशा 3 वर्ष करत राहिली सहन; डिप्रेशनमुळे तिने गर्भातच गमावले बाळ

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वकील म्हणाले - 'लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच आयशाचा संघर्ष सुरू झाला होता'

23 वर्षांच्या आयशाने गेल्या शनिवारी अहमदाबादच्या साबरमती नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी आयशाने हसत-हसत एक व्हिडिओही शेअर केला होता. आता आयशाच्या हसण्यामागील दुःख वकीलांच्या माध्यमातून समोर आले आहे.

आयशाचे वकील जफर पठाण यांनी चकीत करणारे खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, 23 वर्षांच्या आयशाचे लग्न राजस्थानच्या जालौर येथे राहणाऱ्या आरिफसोबत 2018 मध्ये झाले होते. आरिफचे राजस्थानमधील एका मुलीसोबत अफेअर सुरू होते. आयशासमोरच आरिफ आपल्या गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ कॉलवर बोलायचा. तो आपल्या प्रेमिकेवर पैसे उडवायचा आणि याच कारणामुळे आयशाच्या वडिलांकडून पैशांची मागणी करायचा.

वकील म्हणाले - 'लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच आयशाचा संघर्ष सुरू झाला होता'
जफर सांगतात की, साबरमती रिव्हरफ्रंटवर आयशाने बनवलेला व्हिडिओ पाहून लोक चकीत झाले आहेत. मात्र सत्य हे आहे की, आयशाचा संघर्ष तिच्या लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच सुरू झाला होता. स्वतः आरिफनेच आयसाला सांगितले होते की, तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. तरीही आयसाने आपल्या गरीब-आई वडिलांची अब्रु वाचवण्यासाठी लढत राहिली. ती प्रत्येकक्षणी नवीन अडचणीचा सामना करत होती, मात्र ती शांत राहिली. एक पती त्याच्या पत्नीसमोर व्हिडिओ कॉलवर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलतोय यापेक्षा वाईट काय असू शकते.

आयशाचा पती आरिफ
आयशाचा पती आरिफ

आयशाने अखेरच्या क्षणापर्यंत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला
आयशाचे वकील सांगतात की, आयशा टॅलेंटेड मुलगी होती. अभ्यासासोबतच घरातील प्रत्येक कामात हुशार होती. बालपणापासूनच तिने आपल्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. तिने सासरीही तसेच केले. आपल्या कुटुंबियांना त्रास होऊ नये म्हणून तिने अखेरच्या क्षणापर्यंत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या वेळी आयशाच्या वडिलांनी मुलीला आवश्यक वस्तू दिल्या. मात्र आयशाचे पती आणि सासरचे लोक समाधानी नव्हते.

डिप्रेशनमुळे गर्भामध्येच झाला बाळाचा मृत्यू
दरम्यान माहिती मिळाली आहे की, एकदा आरिफ आयशाला अहमदाबादला सोडून आला होता. त्यावेळी आयशा प्रेग्नेंट होती. कुटुंबाचा आरोप होता की, आरिफ म्हणाला होता की, जर तुम्ही मला दिड लाख रुपये दिले तरच मी आयशाला आपल्या सोबत घेऊन जाईल.

प्रेग्नेंसीदरम्यान आरिफच्या अशा वागण्यामुळे आयशा कोलमडली होती. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. यामुळे तिला खूप जास्त ब्लीडिंग होऊ लागली. डॉक्टरांनी तात्काळ सर्जरी करण्यास सांगितले, मात्र तिच्या गर्भातील बाळ वाचू शकले नाही. कुटुंबियांनी म्हटले की, असे असूनही आरिफ आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना काहीच फरक पडला नाही. ते सतत पैशांची मागणी करत राहिले.

आरिफला शिक्षा मिळायला हवी
आयशाचे वडिल लियाकर अली मंगळवारी म्हणाले की, त्यांना आरिफच्या वडिलांना फोन करुन संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कधीच माझा फोन उचलला नाही. माझी आयशा परत येणार नाही, मात्र तिच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे. जेणेकरुन कोणाच्याही मुलीसोबत असे होणार नाही. माझी मुलगी आयशा हसमुख होती, मात्र लग्नानंतर हुंड्यासाठी तिचे आयुष्य नरक बनले होते. एकदा तर सासरच्या लोकांनी तिला तीन दिवस जेवायला दिले नव्हते.

आयशाच्या पतीला पालीमधून अटक
गुजरात पोलिस जालौरमध्ये आरिफच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबियांनी सांगितले की, तो एका लग्नात गेला होता आणि तेथून कुठेतरी निघून गेला. यानंतर त्याच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे आरिफला सोमवारी रात्री पालीमधून अटक करण्यात आली.

आयशाने साबरमतीच्या काठावर उभे होऊन हा व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपल्या भावना तिने व्यक्त केल्या होत्या. या दरम्यान हसताना ती भावूकही झाली होती. ती म्हणाली होती की, मी जे काही करत आहे, ते माझ्या मर्जीने करत आहे. यासाठी कुणाचाही दबाव नाही.

बातम्या आणखी आहेत...