आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. एका अमेरिकन अधिकाऱ्याने उघड केले की, तो बाल्कनीत फिरायला आला असताना रीपर ड्रोनमधून दोन हेलफायर क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
अफगाणिस्तानच्या वेळेनुसार रविवारी सकाळी 6.18 वाजता हा हल्ला करण्यात आला तेव्हा अमेरिकेत शनिवारी रात्री 9.48 वाजले होते. अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकन एजन्सी गेल्या 6 महिन्यांपासून सतत त्याचा पाठलाग करत होत्या.
पत्नी-मुलीला ट्रॅक करत होत्या अमेरिकी एजन्सीज, जवाहिरीच सापडला
या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या गुप्तचर सूत्रांना कळले की, अल-जवाहरीची पत्नी, मुलगी आणि नातू काबूलमधील एका घरात स्थलांतरित झाले आहेत. अमेरिकन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जवाहिरीचे कुटुंबीय सर्व खबरदारी घेत होते जेणेकरून कोणीही त्यांचा पाठलाग करू नये.
अल-जवाहिरीही घरात असू शकतो, असा विश्वास अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना होता. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ओसामा बिन लादेनसारखाच जवाहिरीच्या जगण्याचा पॅटर्न समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांचा आणि पद्धतींचा वापर करण्यात आला, ज्यामुळे तो त्या घरात उपस्थित असल्याची पुष्टी झाली. यावरून आणखी एक गोष्ट कळली की, तो बाल्कनीत वेळ घालवतो. त्यामुळे हल्ल्याची योजना आखून तो मारला गेला. गेल्या 12 महिन्यांपासून अमेरिकन एजन्सी जवाहिरीचा पाठलाग करत होत्या.
जवाहिरीचे वास्तव्य शिरपूरमध्ये
मध्य काबूलच्या शिरपूर भागात ही जागा आहे. हा संपूर्ण परिसर अफगाण संरक्षण मंत्रालयाचा आहे. अलीकडच्या काळात येथे अफगाणिस्तानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची घरे आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबानचे गृहमंत्री आणि कुख्यात दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी यांनी जवाहिरीला अत्यंत सुरक्षित घरात आश्रय दिला होता.
कुटुंबासह घरात राहत होता
अमेरिकन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार जवाहिरी आपल्या कुटुंबासह सेफ हाऊसमध्ये राहत होता. या हल्ल्यात कुटुंबाला कोणतीही हानी झाली नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याबाबत अमेरिकेने तालिबानला कोणतीही माहिती दिलेली नाही.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबान सरकार संतापले असून त्यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्ला यांनी सांगितले की, 31 जुलै रोजी काबुल शहरातील शिरपूर भागात हवाई हल्ला करण्यात आला. सुरुवातीला हल्ल्याचे स्वरूप कळू शकले नाही, मात्र सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास केला. हे अमेरिकेच्या ड्रोनने केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
9/11 हल्ल्याचा आरोपी होता जवाहिरी
11 सप्टेंबर 2001 रोजी 19 दहशतवाद्यांनी 4 व्यावसायिक विमानांचे अपहरण करून अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरला धडक दिली. अमेरिकेत तो 9/11 हल्ला म्हणून ओळखला जातो. या हल्ल्यात 93 देशांतील 2,977 लोक मारले गेले. या हल्ल्यात ओसामा बिन लादेन, अल जवाहिरी यांच्यासह अल कायदाच्या सर्व दहशतवाद्यांना अमेरिकन तपास संस्थेने आरोपी केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.