आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवाळीला अयोध्या श्री रामाच्या स्वागतासाठी सजली आहे. पहिल्यांदा रामलला मंदिरात 11 हजारा दिवे पेटवण्यात येणार आहेत. तिकडे शरयू किनाऱ्यावर 24 तटांना सहा लाख दिव्यांनी सजवण्यात आले आहे. हे देखील आज संध्याकाळी झगमगणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल संध्याकाळी राम जन्मभूमी परिसरातमध्ये रामललाच्या दर्शनासाठी जातील. यानंतर दिवे प्रज्वलित करुन दिपोत्सवाचे उद्घाटन करतील. याच काळात कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी अयोध्या सील करण्यात आली आहे. बाहेरच्या लोकांना अयोध्येतील प्रवेशावर बंदी घातली आहे.
दीप श्रृंखलामध्ये महिला सशक्तिकरणाचे प्रदर्शन
शरयूच्या किनाऱ्यावर सजलेल्या दीप श्रृंखलामध्ये महिला सशक्तिकरणाचा संदेश दिला गेला आहे. अवध यूनिवर्सिटीच्या कला आणि फाइन आर्ट विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिव्यासह राम कथेचे प्रसंग दाखवले आहेत.
प्रमुख झलकमध्ये घाट क्रमांक दोनवर सामाजिक सौहार्द आणि महिला सशक्तिकरणाचा संदेश देण्यात आला आहे. घाट क्रमांक तीनवर वनवासच्या 14 वर्षांनंतर परतलेल्या श्रीरामाचे पुष्पक विमान दिव्यांनी तयार करण्यात आले आहे. घाट क्रमांक पाचवर पर्वतांवरुन उडणाऱ्या हनुमानाची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. तर घाट क्रमांक 10 वर श्रीराम दरबारची पेंटिग बनवण्यात आली आहे.
ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आले DIG दीपक कुमार यांच्यानुसार, ड्रोन कॅमराने संपूर्ण अयोध्याकडे लक्ष ठेवले जात आहे. मोठ्या संख्येत पोलिस तैनात आहेत. अयोध्येमध्येच 12 स्थानांवर रुट डायवर्ट करण्यात आला आहे. एंबुलेंस आणि रुग्णांच्या वाहनांसाठी विशेष ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आले आहे.
दीपोत्सव 2020 चे प्रमुख कार्यक्रम
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.