आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्येत दिवाळीचा जल्लोष:11 हजार दिव्यांनी रामललाचे मंदिर प्रज्वलित, अयोध्येत तीन दिवसांच्या दीपोत्सवाला सुरुवात

अयोध्या4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भगवान श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली आहे. आज पहिल्यांदाच रामललाच्या मंदिरात 11 हजार दिप प्रज्वलीत करण्यात आले. या निमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अयोध्येत जाऊन पुजा केली. यानंतर रामकथा पार्कमध्ये भगवान श्री रामाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी योगी अदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेल यांनी संध्याकाळी दीपोत्सवाची सुरुवात केली. दीपोत्सवासाठी शरयूच्या 24 घाटांना सहा लाख दिव्यांनी प्रज्वलीत करण्यात आले आहे.

अयोध्येत तीन दिवसांच्या दीपोत्सवाची सुरुवात शुक्रवारी झाली. यावेळी भगवान रामाचा राज्याभिषेक करण्यात आला. या निमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भगवान श्री रामाचे मंदिर बनण्याची वाट पाहत जगभरातील भक्तांच्या पिढ्या गेल्या. भक्तांचे हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. आज सर्वांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

दीपोत्सवादरम्यान संपूर्ण अयोध्या राममय दिसत आहे. प्रशासनाने शहरात रामकथेचे प्रसंग जागोजागी दाखवले आहेत. तर, स्थानिक कलाकारांनी रामायणातील पात्रांचे वेश धारण केले आहेत. दरम्यान, कोविड प्रोटोकालचे पालन करण्यासाठी अयोध्येला सील करण्यात आले आहे. बाहेरच्या लोकांना अयोध्येत येण्यास बंदी आहे.

बातम्या आणखी आहेत...