आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येतील धन्नीपूरमध्ये पाच एकरमध्ये बांधल्या जाणाऱ्या मशिदीसाठी आतापर्यंत फक्त २० लाख रुपयांचीच देणगी मिळाली आहे. मशीद बांधण्यासाठी स्थापन इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची येथे २०० खाटांचे रुग्णालय, ग्रंथालय व संग्रहालय बनवण्याची योजना आहे.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर निकाल देताना मशिदीसाठी पाच एकर जमीन देण्याचे निर्देश दिले होते. सुन्नी वक्फ बोर्डाने फेब्रुवारी २०२० मध्ये फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनने देणगीसाठी बँकेत खाते उघडले. फाउंडेशनचे प्रवक्ते अतहर हुसेन यांनी सांगितले, आम्हाला मिळणाऱ्या रकमेवर प्राप्तिकर सवलत मिळत नसल्याने कमी देणगी मिळाली. ८०-जी ची सवलत मिळाल्यानंतर रक्कम वाढेल. आमचा उद्देश रुग्णालय बनवायचा आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी खर्च येईल. आम्ही घरोघरी जाऊन मदत मागत नाहीत. रुग्णालयासाठी लोक तयारीत आहेत. आमच्याकडे ‘बांधिलकी’ आहे. प्राप्तिकर सवलतीनंतर विदेशातील आर्थिक मदतीच्या सवलतीसाठी अर्ज करणार.
जमीन मिळाल्याच्या १६ महिन्यांनंतरही मशिदीचा नकाशा मंजूर झालेला नाही. एका वरिष्ठ मुस्लिम धर्मगुरूंनी सांगितले की, देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून मशीद होईल. अयोध्या विकास प्राधिकरणाने अद्याप नकाशा मंजूर केलेला नाही. यासाठी फाउंडेशनने गेल्या महिन्यात अर्ज केला होता. रुग्णालयाच्या नकाशात प्राधिकरणाने काही आक्षेप घेतले होते. आता नवा नकाशा देत अर्ज करणार असल्याचे हुसेन म्हणाले.
प्रस्तावित इमारत पर्यावरणपूरक व सौरऊर्जेवर असेल. मशिदीच्या पायासाठी २० मीटर खाेल मातीचे नमुने घेण्यात आले आहेत. मातीची भार वहन क्षमता, सॉल्ट, ओलावासह तांत्रिक बिंदूवर प्रयोगशाळेतून अहवाल आला आहे. प्रकल्पाचे मुख्य वास्तुकार एस. एम. अख्तर यांनी सांगितले की, मशिदीत एकाच वेळी २००० जण नमाज अदा करू शकतील. परिसरात रुग्णालय असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.