आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Janam Bhoomi Nyas Chief Mahant Nritya Gopal Das Health Condition Latest News

राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोना:महंत नृत्य गोपाल दास कोरोना पॉझिटिव्ह, भूमीपूजनाच्या सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत एकाच व्यासपिठावर होते

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी महंत नृत्य गोपाल दास मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी गेले होते
  • नृत्य गोपाल दास राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष आहेत

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास (82) यांना कोरोनाची लागण झाली आहे. नृत्य गोपाल दास बुधवारी जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मथुरेत गेले होते. गुरुवारी सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. यानंतर सीएमओने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत जाऊन त्यांची तपासणी केली असता, महंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली. 5 ऑगस्टला म्हणजेच, 8 दिवसांपूर्वी महंत नृत्य गोपाल दास पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनादरम्यान एकाच व्यासपिठावर होते.

यादरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनवरुन महंत यांच्या तब्येतीची चौकशी केली. योगी यांनी डॉक्टर नरेश त्रेहन यांच्याशी चर्चा करुन महंत यांना मेदांता हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यास सांगितले आहे. यानंतर नृत्य गोपाल दास यांना अँब्यूलन्समधून गुडगावमधील मेदांता हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...