आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan August 5 Updates: Ram Mandir Bhoomi Pujan Rituals Starts In Ayodhya Uttar Pradesh

अयोध्येत आजपासून विधी सुरू:गणेशाच्या पुजेने मंदिर भूमिपूजनाच्या विधीला सुरुवात, पाहणी करण्यासाठी योगी अदित्यनात अयोध्यात दाखल

अयोध्या3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 ऑगस्टला होईल राम अर्चना, 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन

500 वर्षांच्या संघर्षानंतर अखेर अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू होत आहे. सोमवारी गणेशाच्या पुजेने तीन दिवसांच्या विधीला सुरुवात झाली. यानंतर सीतेची कुलदेवी 'छोटी देवकाली' आणि भगवान रामाची कुलदेवी 'मोठी देवकाली'ची पुजा झाली. अयोध्या आणि बनारसमधील 21 विद्वान पंडित पुजा करत आहेत. यादरम्यान तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ अयोध्येत पोहचले.

योगी अदित्यनाथ कालच अयोध्येत येणार होते, पण कॅबिनेट मंत्री कमल रानी यांच्या निधनानंतर त्यांनी दौरा रद्द केला. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सदस्य विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र सीतेच्या कुलदेवीची पुजा करताना.

सीता माहेरवरुन कुलदेवीची मुर्ती घेऊन आल्या होत्या

असे म्हटले जाते की, जनकपूरमध्ये राम-सीतेच्या लग्नानंतर अयोध्येत जाताना सीता आपल्यासोबत कुलदेवीची मुर्ती घेऊन आल्या होत्या. त्यांनी राम जन्म भूमीजवळच याची स्थापना केली होती. याप्रमाणेच बेनीगंजमध्ये मोठ्या देवकालीचे मंदिर आहे. महाराज सुदर्शनने द्वापर युगात याची स्थापना केल्याची मान्यता आहे.

भगवान श्रीरामाची कुलदेवी मोठी देवकालीची आरती करताना मंदिर ट्रस्टचे सदस्य.

पंतप्रधान आधी हनुमानगडीला जातील

अयोध्येतील हनुमानगडीमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून राम अर्चना सुरू होईल. यादरम्यान वर्षातून एकदाच होणारी निशान पुजाही केली जाईल. दुसऱ्या दिवशी राम मंदिराचे भूमिपूजन होईल. पंतप्रधान अयोध्येत आल्यावर सर्वात आधी हनुमानगडीला जातील. या ठिकाणी ते मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यासोबत विशेष पुजा करतील. हनुमानगडी मंदिराचे पुजारी मधुवन दासने सांगितले की, हनुमानाशिवाय भगवान रामाचे कोणतेच कार्य सुरू होऊ शकत नाही. यामुळे आधी मोदी आणि योगी हनुमानगडीला जाऊन पुजा करतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतीक विभागाने मातीच्या 5100 मडक्यांना रंगवले आहे.

अयोध्येच्या मार्गावर रंगीबेरंगी झेंडे लावले जातील

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सांस्कृतीक विभाग संस्कार भारतीने मातीच्या 5100 मडक्यांना रंगवण्याचे काम हाती घेतले आहे. यांना रंग, कपडे, गोटे, आंब्याची पाणे आणि दिव्यांनी सजवले जाईल. हे मटके साकेत महाविद्यालयाकडून जाणाऱ्या अयोध्या मार्गावर ठेवले जातील.

अयोध्येत तयारींचा आढावा घेण्यासाठी योगी पोहचले.

ज्यांना आमंत्रित केले, त्यांनीच यावे- योगी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येसोबतच देश आणि जगासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल. 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भूमीपूजन करतील. यावेळी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यादरम्यान आमंत्रित व्यक्तींनीच या ठिकाणी यावे.