आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर भूमिपूजन सोहळा:होइहि सोइ जो राम रचि राखा : मोदींनी 31 वर्ष जुन्या 9 शिळांद्वारे राम मंदिराचे भूमिपूजन केले, यासाठी फक्त 32 सेकंदचा मुहूर्त होता

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शिला आणि भूमिपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मंदिराच्या पायाभरणीत 9 चांदीच्या विटा लावण्यात आल्या. - Divya Marathi
शिला आणि भूमिपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मंदिराच्या पायाभरणीत 9 चांदीच्या विटा लावण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत 12 वाजून 44 मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन केले. यासाठी केवळ 32 सेकंदचा शुभ मुहूर्त होता. तत्पूर्वी 31 वर्षे जुन्या 9 शिलांचे पूजन केले. यावेळी चांदीच्या विटांची पूजा करण्यात आली. . तत्पूर्वी त्यांनी हनुमानगढीमध्ये दर्शन घेतले आणि पूजा केली. यानंतर त्यांनी साष्टांग नमस्कार घालत रामलल्लांचे दर्शन घेतले.

अयोध्येहून शिलान्यास कार्यक्रम लाइव्ह...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलालचे दर्शन घेणारे आणि हनुमान गढीला जाणारे पहिले पंतप्रधान ठरले. दुपारी 12.30 वाजत मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करतील. मोदी आणि भाजपने 10 पैकी 8 लोकसभा निवडणुकांत राम मंदिर उभारण्याचे आश्वानस दिले होते. ...आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भूमिपूजनाचे पहिले आमंत्रण बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांना पाठवले होते.

492 वर्षांपूर्वी बाबरच्या आदेशानुसार अयोध्येत वादग्रस्त रचना बांधली गेली. 1885 मध्ये पहिल्यांदा हे प्रकरण न्यायालयात गेले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने रामललाच्या बाजुने निकाल दिला. याच्या ठीक नऊ महिन्यांनंतर अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे.

स्वातंत्र्यानंतर मोदी हे एकमेव पंतप्रधान असतील जे हे पद सांभाळताना रामललाच्या दरबारात असतील. त्यांच्या अगोदर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान म्हणून अयोध्येत पोहोचले, पण ते रामललाचे दर्शन घेऊ शकले नाही.

मोदी 29 वर्षांनंतर अयोध्येत

यापूर्वी मोदी 1991 मध्ये अयोध्येत गेले होते. तेव्हा भाजपाचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी तिरंगा यात्रा काढत होते आणि त्या यात्रेत मोदी त्यांच्यासोबत होते. मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी फैजाबाद-आंबेडकर नगरमध्ये एका सभेला संबोधित केले होते मात्र ते अयोध्येत गेले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलाल्लाचे दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलाल्लाचे दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान गढी येथे पूजा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमान गढी येथे पूजा केली.
पंतप्रधान मोदींनी हनुमान गढीत दर्शन घेतले.
पंतप्रधान मोदींनी हनुमान गढीत दर्शन घेतले.
अयोध्येत पोहोचल्यावर सीएम योगींनी हेलिपॅडवर पंतप्रधान मोदींचे अभिवादन केले.
अयोध्येत पोहोचल्यावर सीएम योगींनी हेलिपॅडवर पंतप्रधान मोदींचे अभिवादन केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बाबा रामदेव आणि संतांचे पूजेच्या ठिकाणी अभिवादन करताना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बाबा रामदेव आणि संतांचे पूजेच्या ठिकाणी अभिवादन करताना
माजी केंद्रीय मंत्री उमा भारती कार्यक्रमस्थळी पोहचल्या, यापूर्वी आपण सरयू किनाऱ्यावर थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
माजी केंद्रीय मंत्री उमा भारती कार्यक्रमस्थळी पोहचल्या, यापूर्वी आपण सरयू किनाऱ्यावर थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

अपडेट्स

  • आरएसएस प्रमुख मोहन भागवत कार्यक्रमस्थळी पोहोचले.
  • माजी केंद्रिय मंत्री उमा भारती देखील कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. त्यांनी ट्विट करून सांगितले की, त्यांना राम जन्मभूमी न्यासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. याआधी आपण शिलान्यास दरम्यान शरयू किनारी राहणार असल्याचे म्हटले होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेच्या विमानाने लखनौत पोहचले. येथून ते हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना झाले.
  • मोदी सर्वात पहिले हनुमानगढी येथे जातील. संपूर्ण मंदिर सॅनिटाईझ करण्यात आले आहे. मंदिराजवळ कडक बंदोबस्त आहे.
  • अयोध्येत पोहोचलेले रामदेव बाबा म्हणाले, आज ऐतिहासिक दिवस आहे. आजचा दिवस दीर्घकाळ आठवणीत ठेवला जाईल. देशात रामराज्याची स्थपणा होईल.
  • हनुमानगढीचे मुख्य पुजारी प्रेमदास महाराज म्हणाले की, आज गर्वाचा क्षण आहे. "आम्ही पंतप्रधान मोदी यांना पगडी आणि रामनामी देऊन सन्मान करणार. त्यांना चांदीचे नाणेही देणार आहोत."
बातम्या आणखी आहेत...